“खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद…,आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला का?”; रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar | मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दुसरीकडे, मराठा बांधवांनी थेट मुंबईच्या आझाद मैदानाला लागून असलेल्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
काल रात्रीचा मुक्काम मराठा बांधवांनी आझाद मैदानाला लागून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे केला. मात्र, पावसामुळे आणि कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.
यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे.”
मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न… pic.twitter.com/o2Aj5Ry3LG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 30, 2025
सरकार एवढे निष्ठुर झाले तर…
पुढे त्यांनी लिहिले, “खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल,” असे म्हणत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जरांगेचा बीएमसी आयुक्तांना इशारा
तर मराठा आंदोलकांच्या झालेल्या गैरसोईबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोरांचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केले. बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे,” असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. Rohit Pawar |
हेही वाचा:




