Cooch Behar Trophy 2024 : सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, 51 चौकारासह झळकावलं दिमाखदार द्विशतक…

नवी दिल्ली – भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे ओळखला जायचा. त्याचा हाच आक्रमकपणा आता त्याच्या मुलानेही क्रिकेटच्या मैदानात दाखवून दिला आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागप्रमाणेच त्याचा मुलगा आर्यवीरही आता वडिलांच्या मार्गावर निघाला आहे.
🤩 Aaryavir Sehwag steals the spotlight in the Cooch Behar Trophy!
The young star, son of Virender Sehwag, smashed an incredible 297 runs, just three runs shy of a triple century👊🔥
An outstanding performance that showcases his bright future in cricket.#AaryavirSehwag… pic.twitter.com/slfoTa58hx— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 22, 2024
आर्यवीरने कूचबिहार ट्रॉफीमध्ये अत्यंत स्फोटक फलंदाजी केली. शुक्रवारी आर्यवीर सेहवागने कूचबिहार ट्रॉफीमध्ये 309 चेंडूंचा सामना करत 297 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 51 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याने ही दमदार इनिंग खेळून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्याच्या वडिलांनीही त्याच्या खेळीचे कौतुक केले. सेहवागने ट्विट करून मुलाचे कौतुक केले. तो म्हणाला, “खूप छान केले आर्यवीर! मात्र, 3 धावांनी तुझे त्रिशतक हुकले…‘
297 धावांची दमदार इनिंग खेळूनही आर्यवीरला त्याची आवडती भेट मिळणार नाही. खरं तर, सेहवागने 2015 मध्ये आपल्या मुलाला वचन दिले होते की जर तो त्याचा 319 धावांचा विक्रम मोडण्यात यशस्वी झाला तर तो त्याला फेरारी कार भेट देईल.
आता त्याने आर्यवीरला याची आठवण करून दिली आणि म्हणाला – “आर्यवीर सेहवाग खूप चांगला खेळला. फेरारी 23 धावांनी हुकली. पण चांगले केले, उत्साह कायम ठेवा आणि आशा आहे की तुम्ही आणखी अनेक शतके आणि दुहेरी आणि तिहेरी शतके झळकावाल.





