सीएसके-आरसीबी नव्हे, तर ‘हे’ चार संघ IPL 2025 च्या प्लेऑफ्समध्ये पोहोचणार; वीरेंद्र सेहवागचं मोठं भाकीत

Virender Sehwag prediction for IPL 2025 playoffs Teams : आयपीएल २०२५ सुरू होण्यास आता फक्त काही तास शिल्लक आहेत. या स्पर्धेत, प्रत्येक संघ दुसऱ्या संघापेक्षा अधिक शक्तिशाली खेळाडूंसह मैदानात उतरण्याच प्रयत्न करत आहेत. आता या स्पर्धेच्या प्लेऑफ्समध्ये कोण पोहोचणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशात भारताचा माजी माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने क्रिकबझच्या एका कार्यक्रमात प्लेऑफ्समध्ये कोणते चार संघ पात्र ठरतील याबद्दल मोठं भाकीत करत सर्वांना चकीत केले आहे. त्याच्याबरोबर इतरही काही दिग्गज खेळाडूंनी भाकीतं केली आहे.
क्रिकबझवरील एका कार्यक्रमात झालेल्या चर्चेदरम्यान, क्रिकेट पंडित आणि तज्ञांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे आणि आयपीएल २०२५ च्या प्लेऑफ्समध्ये प्रवेश करू शकणाऱ्या चार संघांचा अंदाज वर्तवला आहे. काही संघांची नावे स्वाभाविकपणे समोर येत असताना, काही संघ असे आहेत ज्यांनी आश्चर्यचकित केले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने केलेलं भाकी सर्वाधिक चर्चेत आहे.
वीरेंद्र सेहवागच्या भाकीताने वेधलं सर्वांचं लक्ष –
वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांना त्याच्या टॉप-४ संघांमध्ये स्थान दिले नाही. सेहवागच्या मते, यावेळी मुंबई इंडियन्स (एमआय), सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच), पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकतात. आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी.
हेही वाचा – IPL 2025 चा हंगाम सुरु होण्यापूर्वी ‘या’ सामन्याचे बदलले ठिकाण, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला ‘हा’ निर्णय
हैदराबाद आणि मुंबई हे सर्वात प्रबळ दावेदार -.
यावेळी क्रिकेट तज्ज्ञांकडून सर्वाधिक पाठिंबा सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सना मिळाला आहे. ९ पैकी ८ तज्ञांनी सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एक प्रबळ दावेदार मानले आहे. या संघाकडे ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनसारखे स्फोटक फलंदाज आहेत, जे कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला उद्ध्वस्त करू शकतात. प्लेऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सलाही प्रबळ दावेदार मानले जात आहे. ७ तज्ञांनी त्याला टॉप-४ मध्ये स्थान दिले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हा संघ संतुलित दिसतो, तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह सारखे मोठे खेळाडू मुंबई इंडियन्सला एक मजबूत संघ बनवतात.
आयपीएल २०२५ प्लेऑफसाठी भाकीतं –
- अॅडम गिलख्रिस्ट: पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स
- हर्ष भोगले: सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- शॉन पोलॉक: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज
- मनोज तिवारी: सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स
- मायकेल वॉन: गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज





