Rohit Sharma : ‘आता त्याच्या जाण्याची वेळी आली आहे…’, हिटमॅनबद्दल माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य

Virender Sehwag advises Rohit Sharma to retire from IPL : रोहित शर्माची आयपीएल २०२५ मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. परंतु, गेल्या तीन डावांमध्ये त्याने काही धावा केल्या आहेत, पण त्याला मोठी खेळी खेळता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माचा धावा काढण्यासाठीचा संघर्ष सुरुच आहे. आता रोहितबद्दल माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने म्हणाला आहे की, त्याची निघून जाण्याची वेळ आली आहे.
सेहवागने रोहितला दिला निवृत्ती घेण्याचा सल्ला –
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रोहित शर्माने १६ चेंडूत २६ धावांची खेळी केली. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. आयपीएल २०२६ च्या आतापर्यंतच्या ६ डावांमध्ये रोहित शर्माने १४ पेक्षा कमी सरासरीने फक्त ८२ धावा केल्या आहेत. वीरेंद्र सेहवागने रोहितला त्याचा वारसा जपण्याबद्दल इशारा दिला. त्याचबरोबर असेही म्हटले की, कदाचित आता या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
वारसा खराब होत आहे –
आईपीएल के इस सीजन में रोहित शर्मा की फॉर्म को देखते हुए पूर्व भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सहवाग ने बड़ा बयान दिया है. सहवाग ने सेंकेत दिया है कि रोहित रोहित के लिए इस फॉर्मेट से संन्यास लेने का समय आ गया है.#RohitSharma #IPL #IPL2025 #VirenderSehwag #Cricket #ATDigital pic.twitter.com/V36TJ2De5g
— AajTak (@aajtak) April 18, 2025
क्रिकबझवर बोलताना सेहवाग म्हणाला, “जर तुम्ही गेल्या १० वर्षातील रोहितची आयपीएलमधील आकडेवारी पाहिली, तर त्याने फक्त एकदाच ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणून तो असा खेळाडू नाही जो ५०० किंवा ७०० धावा करायला हव्यात असा विचार करतो. जर तो तसा विचार करत असेल तर तो ते करू शकतो. जेव्हा तो भारतीय कर्णधार बनला तेव्हा तो म्हणाला होता की त्याला असा खेळाडू व्हायचे आहे, जो पॉवरप्लेचा फायदा घेऊ इच्छितो आणि संधींचा फायदा घेऊ इच्छितो.”
हेही वाचा – RCB vs PBKS सामन्यात पावसाचा अडथळा! IPL 2025 मध्ये पावसाशी संबंधित काय आहेत नियम? जाणून घ्या
आता त्याच्या जाण्याची वेळ आली आहे –
सेहवाग पुढे म्हणाला, “म्हणून तो एकटाच सर्व त्याग करू इच्छितो, परंतु तो या वस्तुस्थितीचा विचार करत नाही की दिवसाच्या शेवटी जेव्हा तो चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्याचा वारसा खराब होत आहे. त्यामुळे आता त्याच्या जाण्याची वेळ आली आहे. निवृत्त होण्यापूर्वी, तुम्हाला चाहत्यांना तुमची आठवण ठेवण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल, असे क्षण नाही जे त्यांना विचार करायला लावतील की ते त्याला का ड्रॉप करत नाहीत.”
हेही वाचा –MI vs SRH : विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा बॉलरला का? वरुण चक्रवर्तीने उपस्थित केला मोठा सवाल
‘१० चेंडू जास्त घ्या, पण…’ – वीरेंद्र सेहवाग
वीरु पुढे म्हणाला, “१० चेंडू जास्त घ्या, पण किमान खेळा आणि स्वतःला एक संधी द्या. तो कधीकधी बॅक ऑफ लेंथ बॉलवर पुल शॉट्स खेळून बाद होतो. म्हणून त्याने ठरवले पाहिजे की तो एका डावात पुल शॉट्स अजिबात खेळणार नाही, पण त्याला हे कोण समजावून सांगेल? असा कोणीतरी असावा जो त्याला सामान्य क्रिकेट खेळायला सांगेल. मी जेव्हा तिथे होतो तेव्हा सचिन, द्रविड किंवा गांगुली मला सामान्य क्रिकेट खेळायला सांगायचे.”





