काय सांगता.! विराट कोहलीच्या हातावर टॅटू काढण्यासाठी लागले तब्बल ‘इतके’ तास; स्टुडिओबाहेर तैनात होते ‘CRPF’चे सैनिक

नवी दिल्ली – भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. क्रिकेट विश्वात विराटला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. अनेकांना त्याच्यासारखी दाडी ठेवणं आणि टॅटू काढण्याचं वेड लागलाय. विराट क्रिकेटशिवाय त्याच्या लूकमुळे देखील सतत चर्चेत असतो. विराट कोहली हा टॅटू प्रेमी आहे. विराट कोहलीच्या शरीरावर आतापर्यंत तब्बल 11 टॅटू असून, आता यामध्ये आणखी एक नवीन टॅटूची भर पडल्याचं दिसून आलं आहे.
नुकतंच विराट कोहलीने आपल्या हातावर नवीन टॅटू काढला असून, सध्या सगळीकडे त्याच्या या खास टॅटूची चर्चा होताना दिसत आहे. ज्याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलच्या 16 व्या सीजनसाठी विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच नवीन हेअरस्टाईल केल्याचे समोर आले होते. आता यासोबतच विराटने त्याच्या शरीरावर नवा टॅटू देखील काढल्याचे पाहायला मिळत आहे.
टॅटू क्रिएटर सनी भानुशाली यांनी विराट कोहलीचा हा नवीन टॅटू काढला आहे. भानुशाली यांनी असं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी विराट कोहली नवीन टॅटू डिझायनचे फोटो घेऊन आला होता. विराट आमच्या कामाचा चाहता असल्याचा विश्वास बसत नाही. त्याचा पुढील टॅटू मी काढावा अशी त्याची इच्छा होती.
विराट कोहलीसाठी नवीन टॅटू खूप महत्वाचा होता. त्यासाठी मला पूर्ण क्षमतेने काम करावे लागले. टॅटू काढण्यासाठी 14 तासांचा कालावधी लागला. या कालावधीत स्टूडिओ पूर्णपणे बंद होता. तसेच सर्व सुरक्षेची काळजी घेतली. सीआरफीएफचे सैनिक स्टुडिओबाहेर होते. टॅटू पूर्ण झाल्यानंतर विराटने आश्चर्याने नवीन टॅटूकडे पाहिले. आणि तो खूप आनंदी सुद्धा दिसत होता.





