RCB Victory Parade : विजयाचा जल्लोष अन् चेंगराचेंगरीची शोकांतिका; स्टेडियममध्ये काय म्हणाला विराट? जाणून घ्या

RCB Victory Parade Virat Kohli Speech at Chinnaswamy Stadium : आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर एका दिवसानंतर, आरसीबी संघ बुधवारी त्यांच्या होमग्राउंड बंगळुरूला पोहोचला. येथे विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर, संघ त्यांच्या होमग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमकडे रवाना झाला. पण त्यापूर्वीच स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच आरसीबी संघ चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहली आणि संघाचा कर्णधार रजत पाटीदार यांनी चाहत्यांचे आभार मानले. जेव्हा विराट कोहली बोलण्यासाठी स्टेजवर पोहोचला तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी आरसीबी-आरसीबीचा जयजयकार करायला सुरुवात केली. त्यांनी कोहलीचा जयजयकारही केला. चाहत्यांच्या आवाजामुळे कोहली काही काळ बोलू शकला नाही.
🚨Scary visuals emerging from Bengaluru — a stampede during celebrations has reportedly left several injured and a few dead. The situation appears critical. pic.twitter.com/awNTLEzrqo
— BALA (@erbmjha) June 4, 2025
विराट कोहली काय म्हणाला?
#WATCH | Virat Kohli praises #RoyalChallengersBengaluru captain Rajat Patidar as RCB ended their 18-year-long wait and won their maiden IPL trophy yesterday after defeating Punjab Kings
“He will lead us for a long time,” says Virat Kohli
(Visuals from M Chinnaswamy Stadium in… pic.twitter.com/V1W8GrR5Qg
— ANI (@ANI) June 4, 2025
विराट कोहली म्हणाला, “मी येथे येताच नेहमी ‘नमस्कार बेंगळुरू’ म्हणतो! हा क्षण आम्हा सर्वांसाठी खास आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून आम्ही यासाठी नियोजन केले होते. तुम्हा सर्वांनी हा विजय साकार केला आहे. तुम्ही सर्वजण या ट्रॉफीचे हकदार आहात. इतके भव्य स्वागत केल्याबद्दल धन्यवाद!” यानंतर विराट कोहलीने कर्णधार रजत पाटीदारचे आभार मानले.
हेही वाचा – RCB Victory Parade : आरसीबीच्या विजयाला दु:खाची झालर! चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू, ४० जखमी
विराट कोहलीकडून कर्णधार रजत पाटीदारचे कौतुक –
विराट कोहली कर्णधार रजत पाटीदारबद्दल बोलताना म्हणाला की, “रजतने आपल्या अपेक्षा प्रत्यक्षात आणल्या. तो यापुढेही आरसीबीचे दीर्घकाळ नेतृत्व करेल. हा विजय फक्त खेळाडूंसाठी किंवा माझ्यासारख्या १८ वर्षांपासून संघासोबत असलेल्यांसाठी नाही, तर तुम्हा सर्व चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आरसीबीला नेहमी साथ दिली. मी माझे तरुणपण, माझी ऊर्जा आणि अनुभव या संघाला दिला. प्रत्येक हंगामात विजय मिळवण्यासाठी मी सर्वस्व दिले. हा क्षण येईल असे कधी वाटले नव्हते. शेवटची चेंडू टाकल्यानंतर मी भावनाविवश झालो. ही भावना अवर्णनीय आहे.”





