भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कर्णधार रोहित शर्मासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने ( Harbhajan Singh ) टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आशिष नेहराची ( Ashish Nehra ) भारताच्या टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करावी, असे हरभजन सिंगने मत व्यक्त केले आहे. हरभजन म्हणाला की, ‘राहुल द्रविड हा एक चांगला प्रशिक्षक आहे, मात्र आशिष नेहरा टी-२० फॉरमॅटमध्ये चांगला प्रशिक्षक ठरू शकतो.’
“एका फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केल्याने फायदा”, कॅप्टन शिखर धवनने सांगितल्या खास गोष्टी!
हरभजन सिंगने ( Harbhajan Singh ) म्हटले की, ‘भारताच्या टी-२० संघासाठी प्रशिक्षकपदी अशा व्यक्तीची निवड करा ज्याने नुकताच क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. जेणेकरून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील खेळाडूंकडून त्याला चांगली कामगिरी करून घेता येईल. यासाठी आशिष नेहरा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.” आशिष नेहराला ( Ashish Nehra ) टी-२० प्रशिक्षक बनवावे किंवा राहुल द्रविडला हटवावे, असे हरभजन सिंगने स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्याने हातवारे करत आशिष नेहराची बाजू मांडली आहे.
“एका फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केल्याने फायदा”, कॅप्टन शिखर धवनने सांगितल्या खास गोष्टी!
हरभजन ( Harbhajan Singh ) पुढे म्हणाला की, “टी-२०प्रकारामध्ये भारतीय संघाला प्रशिक्षक म्हणून नुकतेच क्रिकेटमधून निवृत्त झालेले कोणीतरी हवे आहे. कारण असे खेळाडू प्रशिक्षक म्हणून चांगले काम करू शकतात. मला राहुल द्रविडबद्दल खूप आदर आहे. राहुल द्रविडसोबत मी बराच काळ खेळलो आहे. मला माहित आहे की राहुल द्रविडला प्रशिक्षकपदाची खूप चांगली समज आहे, मात्र टी-२० प्रशिक्षक म्हणून ज्या खेळाडूंनी अलीकडच्या काळात क्रिकेटला अलविदा केले आहे ते एक चांगला पर्याय ठरू शकतात. राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवावे असे मी म्हणत नाही, पण राहुल द्रविड आणि आशिष नेहरा ( Ashish Nehra ) मिळून टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत चांगली टीम बनवू शकतात.”