Virat Vrindavan Controversy : “महाराजांचा टीआरपी वाढवण्यासाठी विराटचा वापर!”; ५ कोटींच्या डीलचा दावा करत वृंदावनमध्ये मोठा वाद; पाहा VIDEO
Virat Vrindavan Controversy : एका मोठ्या प्रॉपर्टी सिंडिकेटने विराट कोहलीची प्रेमानंद महाराजांशी भेट घडवून आणण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च केले, असा थेट आरोप फलहारी यांनी केला आहे.

Virat Kohli Premanand Maharaj Vrindavan 5 Crore Syndicate Allegation Dispute : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या वृंदावन भेटीवरून मोठा वाद उफाळून आला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश फलहारी यांनी एका व्हिडिओद्वारे खळबळजनक दावा केला आहे. एका मोठ्या प्रॉपर्टी सिंडिकेटने विराट कोहलीची प्रेमानंद महाराजांशी भेट घडवून आणण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च केले, असा थेट आरोप फलहारी यांनी केला आहे. या दाव्यामुळे आध्यात्मिक आणि क्रीडावर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रॉपर्टी व्यापाऱ्यांचा खेळ; यमुनेच्या खादर भागातील जमिनी लाटण्याचा कट!
दिनेश फलहारी यांच्या मते, वृंदावनमध्ये सध्या संतांचे दोन गट पडले असून त्यात काही प्रॉपर्टी डिलर्स घुसले आहेत. यमुना खादर परिसरातील जमिनींच्या व्यवहारांसाठी निवडक संतांची प्रसिद्धी वाढवली जात आहे. राजस्थानमधील काही प्रॉपर्टी माफिया सक्रिय झाले असून, त्यांनी स्वतःच्या साम्राज्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. याच टोळीने महाराजांचा ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी विराट कोहलीचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला.
“तुम्ही वृंदावन सोडा”; प्रेमानंद महाराजांना गोवर्धनला येण्याची विनंती!
🚨 BIG CLAIM
Dinesh Falhari, president of Shri Krishna Janmabhoomi Sangharsh Nyas, claims ₹5 crore was offered to bring Virat Kohli to Premanand Maharaj’s ashram as part of an effort to promote the saint.
The allegation has not been independently verified. https://t.co/ovVu01vHoC
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 5, 2026
फलहारी यांनी प्रेमानंद महाराजांबद्दल आदर व्यक्त करत म्हटले की, महाराज आधीही चांगले संत होते आणि आजही आहेत. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करून माफिया त्यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे महाराजांनी हा वादग्रस्त भाग सोडून गोवर्धन गिरीराज येथे वास्तव्यास यावे, जिथे सर्व ब्रजवासी त्यांची निस्वार्थ सेवा करतील, अशी जाहीर विनंती त्यांनी केली.
विराटच्या भेटीने वाढली प्रसिद्धी; कोट्यवधींच्या खर्चाचा दावा!
₹5 CRORE allegedly paid to get Virat Kohli to visit the ashram? 💀
If true, this isn’t spirituality anymore…
This is celebrity marketing disguised as devotion. 😭
Pay a celebrity → get millions of views → gain followers → build the brand.
Religion really has become one of the biggest marketing businesses in India. 💀
Virat got the money.
Premanand got the fame.
Devotees got the content. 🫡— TRADE WIZARD (@Cash_Traderr) October 6, 2026
दिनेश फलहारी यांच्या दाव्यानुसार, सुरुवातीला प्रेमानंद महाराजांची फारशी ओळख नसताना या डिलर्सनी ५ कोटी रुपये खर्चून विराट कोहलीशी त्यांची भेट घडवली. या भेटीनंतर महाराजांचे नाव जगभरात पोहोचले आणि त्याचा फायदा घेत या टोळीने खादर परिसरातील भूखंडांचे गैरव्यवहार सुरू केल्याचे फलहारी यांनी म्हटले आहे.
२०२३ पासून विराट-अनुष्काचे वृंदावनशी अतूट नाते!
विराट आणि अनुष्काने जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा वृंदावनला भेट देऊन नीम करोली बाबा व माँ आनंदमयी आश्रमाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी प्रेमानंद महाराजांच्या ‘श्री राधा केली कुंज’ आश्रमात अनेकदा हजेरी लावली. २०२५ आणि २०२६ मध्येही कसोटीतील निवृत्तीनंतर या दाम्पत्याने महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. मात्र, आता या भेटींवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वृंदावनमधील वातावरण चांगलेच तापले आहे.





