Virat Leaves Hotel : टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत पोहोचला, नंतर कोहलीनं अचानक धरला घरचा रस्ता; नेमकं कारण काय? VIDEO व्हायरल
Virat Leaves Hotel : लंडनमध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहली इतर खेळाडूंसोबत टीम हॉटेलमध्ये न थांबता तिथून अचानक निघून गेल्याचे समोर आले आहे.

Virat Kohli Leaves Team Hotel Ahead of Lords ODI IND vs ENG 3rd Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना रविवारी, १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. सध्या १-१ अशा बरोबरीत असलेल्या या मालिकेतील थरारासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाला असून, बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओतील एका विशिष्ट दृश्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहली इतर खेळाडूंसोबत टीम हॉटेलमध्ये न थांबता तिथून अचानक निघून गेल्याचे समोर आले आहे.
नेमका काय आहे तो व्हायरल व्हिडीओ?
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, विराट कोहली संपूर्ण संघासोबत विमानाने लंडनला पोहोचला होता. त्यानंतर टीम बसमधून इतर खेळाडूंसोबत तो हॉटेलपर्यंतही आला. मात्र, हॉटेलमध्ये पोहोचताच विराटने आपले सामान घेतले आणि तिथे आधीपासूनच उभ्या असलेल्या एका खाजगी कारमध्ये बसून तो थेट निघून गेला. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट संघापासून वेगळा होऊन लंडन मधील आपल्या घरी गेला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन्ही मुले गेल्या काही काळापासून लंडनमध्येच राहत असल्याने, विराट सामन्यापूर्वी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे.
London Calling 📍👋 #TeamIndia has arrived for the all-important series decider 🙌#ENGvIND pic.twitter.com/TwpVIepLw1
— BCCI (@BCCI) July 18, 2026
कार्डिफमधील कामगिरी आणि शतकाची अपेक्षा –
Virat Kohli arrived at the team hotel in London and then left for his home in his car.❤️ pic.twitter.com/XRezGiX0WO
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 17, 2026
इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विराटसाठी पहिल्या सामन्यात निराशाजनक झाली होती. मात्र, कार्डिफ येथील दुसऱ्या वनडेत त्याने शानदार पुनरागमन करत ६५ धावांची एकाकी झुंज दिली. तो बाद झाल्यावर टीम इंडियाचा डाव २३३ धावांत आटोपला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. आता लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मालिका जिंकण्याच्या इराद्याने विराट मोठी खेळी करण्यासाठी सज्ज असेल. चाहत्यांनाही त्याच्याकडून एका ऐतिहासिक शतकाची अपेक्षा आहे.
विराटला मिळणार थेट २ महिन्यांची विश्रांती –
.@imVkohli‘s arrival in London for the 3rd #ENGvIND ODI! 🔥 pic.twitter.com/Y6GH8OWsJk
— ViratGang.in (@ViratGangIN) July 18, 2026
कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेला विराट कोहली आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. लॉर्ड्सच्या या निर्णायक सामन्यांनंतर विराटला प्रदीर्घ विश्रांती मिळणार आहे, कारण भारताची पुढील वनडे मालिका थेट २७ सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सामन्यात तो आपली पूर्ण ताकद पणाला लावेल.





