Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : इशान किशनवर कोसळला दुःखाचा डोंगर; फायनल सामन्याआधी अपघातात बहिणीचे निधन, पोस्ट करत म्हणाला…
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : चुलत बहिणीचे अपघातात निधन झाले असतानाही इशान किशन भारतीय संघासाठी खेळला. संघाला विजय मिळाल्यानंतर त्याने चुलत बहिणीचे अपघातात निधन झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे.

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) वर भारतीय संघाने उत्तम खेळी करत नाव कोरलं आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा दिमाखदार अंतिम सामाना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडवर भारताने ९६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आयसीसी टी-२० विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया (Team India) हा पहिला संघ ठरला आहे.
टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर देशभारत जल्लोष साजरा केला गेला. स्टेडियम विजयाच्या घोषणांनी दणाणून गेले. सगळ्याच खेळाडूंचा आनंद गगणात मानवेसा झाला असल्याचे पाहायला मिळाले. पण टीम इंडियाचा इशान किशन याने अत्यंत दुःखद घटना सोशल मीडियावर टीम इंडियाने विजय मिळाल्यानंतर शेअर केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशनच्या चुलत बहीणीचे आणि तिच्या पतीचे कार अपघातामध्ये निधन झाले. हा दुःखद प्रसंग असतानाही हे सर्व विसरुन इशान किशन मैदानात उतरला आणि आक्रमक खेळीने अर्धशतक ठोकलं. अर्धशतक झळकावल्यानंतर इशानने आकाशात बघत बहिणीला श्रद्धांजली वाहिली.
Ishan Kishan said, “I lost my cousin sister in a car accident just before the Final. I played for her, I spoke to Hardik bhai, and he said to put the team ahead. I dedicate this victory to her and also today is Women’s Day, so it makes it more special”. pic.twitter.com/iVShVsuql9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2026
वैष्णवी सिंह असे इशान किशनच्या चुलत बहिणीचे नाव आहे. इशाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावले. मी तिच्यासाठी खेळलो, मी हार्दिक पांड्यासोबत बोललो आणि त्याने संघाला प्राधान्य देण्यास सांगितले. मी हा विजय तिला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो. अंतिम सामन्यात इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.
कसा झाला अंतिम सामाना? Ind vs NZ Final T20 World Cup 2026
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते फलंदाज संजू सॅमसन याच्या आक्रमक खेळीमुळे. त्याने ४६ चेंडूत आठ षटकांसह ८९ धावा केल्या. इशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. जेम्स नीशामने १६ व्या षटकांत तीन फलंदाजांना बाद केल्यानंतर काहीवेळ डावाला ब्रेक लागला. त्यानंतर अभिषेक शर्माने २१ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकांसह ५२ धावा केल्या. तर इशा किशनने २५ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके लावत भारताला पाच बाद २५५ टप्प्यापर्यंत नेले.





