Sanju Samson Records : संजू सॅमसनचा वानखेडेवर ‘रुद्रावतार’! हिटमॅनला मागे टाकत किंग कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी
Sanju Samson Records : संजू सॅमसन आता एका टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. संजूने केवळ ४ सामन्यात १६ षटकार ठोकले आहेत.

Sanju Samson Records IND vs ENG Semifinal : टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात संजू सॅमसनने इंग्लंडच्या गोलंदाजीचे वाभाडे काढत ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकले. या खेळीसह संजूने भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
रोहित शर्माचा मोडला ‘तो’ षटकारांचा विक्रम –
संजू सॅमसन आता एका टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. संजूने केवळ ४ सामन्यात १६ षटकार ठोकले आहेत.
एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय:
- संजू सॅमसन: १६ षटकार (२०२६)
- रोहित शर्मा: १५ षटकार (२०२४)
- शिवम दुबे: १५ षटकार (२०२६)
- इशान किशन: १४ षटकार (२०२६)
- हार्दिक पांड्या: १४ षटकार (२०२६)
विराट कोहलीच्या पंक्तीत जाऊन बसला संजू –
Samson-Kishan set India’s highest T20 WC knockout stand
Read @ANI Story | https://t.co/BcuyRD9yjz#SanjuSamson #INDvsENG #T20WorldCup #cricket #TeamIndia #IshanKishan pic.twitter.com/Kibgf2rD66
— ANI Digital (@ani_digital) March 5, 2026
केवळ रोहितच नाही, तर संजूने ‘किंग’ कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. एकाच टी-२० विश्वचषकात दोन वेळा ७५ पेक्षा जास्त धावांची खेळी करणारा संजू हा विराटनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. विराटने २०१६ मध्ये हा पराक्रम केला होता.याशिवाय, टी-२० विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याच्या बाबतीतही संजूने विराटची (८९ धावा) बरोबरी केली आहे.
टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर –
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर संजूला सुरुवातीच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संजूची संघात एन्ट्री झाली आणि त्याने वेस्ट इंडिज व आता इंग्लंडविरुद्ध तुफानी खेळी करून आपले स्थान पक्के केले आहे. या दमदार कामगिरीसह त्याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.





