Virat Kohli Memories : “तो विजय म्हणजे तुक्का नव्हता! शेवटच्या ३ चेंडूंचा थरार सांगताना विराट भावूक; पाहा RCBचा ‘तो’ स्पेशल VIDEO
Virat Kohli Memories : विराट कोहलीने त्या ऐतिहासिक रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला असून, विजयाचा तो क्षण शब्दांत मांडताना तो कमालीचा भावूक झाला.

Virat Kohli Memories RCB IPL 2025 Victory Speech Video Viral : आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली २०२५ च्या त्या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना दिसत आहे. “आरसीबी कुटुंबातील प्रत्येकासाठी ती रात्र अत्यंत खास होती. मी पहिल्या दिवसापासून या संघाचा भाग आहे. मी आणि आमचे मसाजर रमेश माने, आम्ही या ग्रुपमधील सर्वात जुने सदस्य आहोत. त्यामुळे हे जेतेपद आमच्यासाठी काय आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे,” असे विराटने नमूद केले.
“हा कोणताही योगायोग नव्हता” –
विजेतेपदाच्या प्रवासाबाबत बोलताना विराट म्हणाला की, “आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास होता. पण समोर असा संघ होता ज्याने बलाढ्य संघांना हरवून फायनल गाठली होती. अनेकदा जवळ येऊनही जेतेपदाने हुलकावणी दिली होती, त्या अनुभवांनी आम्हाला अधिक प्रबळ बनवले. आमचा विजय हा कोणताही ‘तुक्का’ किंवा योगायोग नव्हता; आम्ही कष्टाने आणि चांगल्या क्रिकेटच्या जोरावर ते यश खेचून आणले होते.”
शेवटच्या ३ चेंडूंचा तो थरार!
𝙍𝘾𝘽 𝙁𝙖𝙢, 𝙮𝙤𝙪’𝙧𝙚 𝙣𝙤𝙩 𝙧𝙚𝙖𝙙𝙮 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙞𝙨… 🥹⭐🏆
Virat reflects on the night of the #IPL2025 Final and what it truly means to be an IPL champion. ❤️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/ZD0v8JCesj
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 22, 2026
विराटने फायनलमधील सर्वात कठीण क्षणांचाही उल्लेख केला. “शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा सामना आपल्या हातात असतो, तेव्हाची धाकधूक वेगळीच असते. यश दयाल नो-बॉल टाकणार नाही याची खात्री होती, पण तरीही निकालाची प्रतीक्षा करताना जीव टांगणीला लागला होता. शेवटच्या ३ चेंडूंची वाट पाहणे, हा संपूर्ण रात्रीचा सर्वात कठीण भाग होता,” असे विराटने हसून सांगितले.
१८ वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला –
विजयानंतरच्या भावना व्यक्त करताना विराट भावूक झाला. तो म्हणाला, “मैदानावर सेलिब्रेशन सुरू असताना माझे संपूर्ण १८ वर्षांचे करिअर डोळ्यासमोर आले. चांगले-वाईट दिवस, चढ-उतार आणि चाहत्यांची साथ… सगळं काही काही मिनिटांत डोळ्यासमोरून गेलं. हा अनुभव मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.”
विराट कोहली आता आयपीएल २०२६ मध्ये गतविजेता म्हणून मैदानात उतरणार असून, आरसीबी आपले जेतेपद राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





