Virat Kohli : ‘तो माझ्या भावासारखा दिसतो…’, विराटसाठी लेकीने फादर्स डे निमित्त लिहलं खास पत्र, अनुष्काने शेअर केला फोटो

Virat Kohli Daughter Vamika Wrote letter for Fathers Day : आज फादर्स डे निमित्त प्रत्येकजण आपल्या वडिलांची आठवण काढत आहे आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी किंवा गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या प्रसंगी आपले वडील कर्नल अजय कुमार शर्मा आणि पती विराट यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने आपली मुलगी वामिकाचा देखील उल्लेख केला.
तो माझ्या भावासारखा दिसतो –
या पोस्टची खासियत म्हणजे अनुष्काने वामिकाने विराटसाठी लिहिलेली एक पत्र देखील शेअर केले आहे. वामिकाने या पत्रामध्ये लिहिले, “तो माझ्या भावासारखा दिसतो. तो खूप मजेशीर आहेत. तो मला गुदगुद्या करतो. मी त्याच्याशी खेळते. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तोही माझ्यावर तितकेच प्रेम करतो.” हा गोड संदेश सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि चाहते याला खूप पसंत करत आहेत.
अनुष्का शर्माची फादर्स डे निमित्त खास पोस्ट –
View this post on Instagram
अनुष्का शर्माने फादर्स डे निमित्त एका पोस्टमध्ये तिच्या वडिलांचा आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, “मी पहिल्यांदा ज्याच्यावर प्रेम केले आणि माझ्या मुलीने ज्याच्यावर पहिल्यांदा प्रेम केले, त्या दोघांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.”
हेही वाचा – Anushka Sharma : अनुष्काने २९ व्या वर्षी विराटशी का केलं होतं लग्न? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना दोन मुले आहेत. १५ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. या खास दिवशी विराटची ४ वर्षांची मुलगी वामिका हिने तिच्या वडिलांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वामिकाने विराटसाठी लिहिलेल्या पत्रावर तिची स्वाक्षरीदेखील आहे.





