Virat Kohli : किंग कोहली पुनरागमनासाठी सज्ज! लंडनमध्ये सराव करतानाचे फोटो व्हायरल

Virat Kohli Comeback Preparation Photos Viral : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे, परंतु त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच्या फोटोमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर त्याच्या सराव सत्राचे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विराट सरावानंतर चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी विराट सज्ज –
सध्या विराट कोहली कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे आणि रिकाम्या वेळेत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी तयारी करत आहे. अक्टोबर 2025 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराटचा सहभाग निश्चित मानला जात आहे आणि याच मालिकेसाठी तो तयारी करत असल्याचे दिसते. यापूर्वीही त्याने सराव सत्रातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
Virat Kohli with fans outside the Lord’s.
– The King is preparing for a massive return! 🐐 pic.twitter.com/6OH3hnGl1U
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2025
नेट्समधील सरावाची झलक –
Virat Kohli’s indoor practice session with Naeem Amin
He is working hard to keep himself fit and ready for ODIs pic.twitter.com/lFaWlSjS31— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) August 8, 2025
काही काळापूर्वी विराट कोहली गुजरात टायटन्सचा सहाय्यक प्रशिक्षक नईम अमिन याच्यासोबत नेट्समध्ये सराव करताना दिसला होता. त्याने स्वतः याचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते आणि नईम याचे आभारही मानले होते. विराट शेवटचा आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात दिसला होता, जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. त्यानंतर तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर आहे. पण आता कोहलीच्या या सराव सत्रामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे, आणि तो पुन्हा एकदा मैदानात दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे दिसते.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –
भारतीय क्रिकेट संघ अक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो फक्त एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :
- पहिला एकदिवसीय सामना – 19 ऑक्टोबर 2025 – पर्थ स्टेडियम, पर्थ
- दुसरा एकदिवसीय सामना – 23 ऑक्टोबर 2025 – अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
- तिसरा एकदिवसीय सामना – 25 ऑक्टोबर 2025 – सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी





