RCB vs DC : विराटचे कर्णधार पाटीदारशी मतभेद? दिनेश कार्तिकशी बोलतानाचा VIDEO व्हायरल

RCB vs DC Virat Kohli chat with Dinesh Karthik video viral : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२५ मध्ये दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सने बेंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान, माजी कर्णधार विराट कोहली एखाद्या गोष्टीबद्दल नाराज दिसत होता आणि तो दिनेश कार्तिककडे तक्रार करताना दिसला. चाहत्यांचा असा विश्वास आहे की कदाचित तो कर्णधार रजत पाटीदारवर रागावला असेल.
आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित षटकांत ७ बाद १६३ धावा केल्या होत्या. यानंतर १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीकडून सुरुवातीलाच धक्का बसला पण केएल राहुलच्या ९३ धावांच्या नाबाद खेळीने बंगळुरूकडून सामना हिसकावून घेतला. यासह दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. मात्र आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
कोहली-कार्तिकच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल –
🚨 VIRAT KOHLI UNLEASHES THE BEAST MODE! 🦁🏏 RCB vs DC just got SPICY! 🌶️
💥 Kohli to Patidar: "CAPTAIN WHO?! अभी दिखाता हूं तेरेको, coach ko Jake chugali karta hu😂!"
🕺 Dinesh Karthik: "मैं तो बस अपनी रोटी का जुगाड़ कर रहा हूं’—don’t drag me into this fire!"
⚡ Is Rajat… pic.twitter.com/OgdGc8I07i
— CRICKET 18 LOVER (@Cricket_18_love) April 11, 2025
दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १५ व्या षटकात केएल राहुलने जोश हेझलवूडच्या षटकात २२ धावा काढून सामन्याचा मार्ग बदलला. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. या षटकातून आरसीबी सावरू शकला नाही आणि दिल्लीने पुन्हा सहज विजय मिळवला. राहुल आणि स्टब्स यांनी १११ धावांची भागीदारी केली. यानंतर १६ व्या षटकात, विराट कोहली सीमारेषेजवळ संघाचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक यांच्याशी बोलत असल्याचे दिसून आले.यावेळी, मात्र तो खूप रागावलेला दिसत होता. तो एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराज होता.
हेही वाचा – MS Dhoni : ‘थाला’ इतिहास रचण्यासाठी सज्ज! आयपीएलच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच ‘हे’ घडणार
त्याच वेळी, चाहत्यांनी असा अंदाज लावला की कदाचित कोहली कर्णधार रजत पाटीदारच्या क्षेत्ररक्षण प्लेसमेंटवर नाराज असेल. यावेळी समालोचक म्हणाले की, जर कोहली किंवा दिनेश कार्तिक यांच्याकडे आरसीबी कर्णधारासाठी काही सूचना असतील तर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा आणि संदेश द्यावा. आता विराट आणि कार्तिक यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





