PBKS vs RCB : विराट कोहलीने मोडला आयपीएलचा सर्वात मोठा विक्रम! रचला नवा कीर्तिमान

PBKS vs RCB Virat Kohli break David Warner record in IPL : आयपीएल २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना ७ विकेट्सने जिंकला. या विजयासह या हंगामातील त्यांचा ५ वा विजय मिळवला. या सामन्यात, आरसीबीसाठी विराट कोहलीच्या फलंदाजीतून एक शानदार अर्धशतकी खेळी दिसून आली, ज्याच्या आधारे त्याने आयपीएलमध्ये एक मोठा पराक्रमही केला आहे. यासह त्याने डेव्हिड वॉर्नरचा एका मोठा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरला टाकले मागे –
कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे, त्याने त्याच्या २६० व्या आयपीएल सामन्यात ही कामगिरी केली आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली फक्त एक धाव काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, परंतु या सामन्यात त्याने पुन्हा त्याच्या जुन्या शैलीत फलंदाजी केली, ज्यासाठी तो ओळखला जातो. ७३ धावा काढणाऱ्या या सामन्यात आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर कोहली नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
When consistency meets class 🫡
Virat Kohli adds another jewel to his crown 👑
🔽 Watch his masterclass against #PBKS ❤️https://t.co/OyKTYlSYLL#TATAIPL | #PBKSvRCB | @imVkohli pic.twitter.com/XYI8cv6uug
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
विराट कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणार फलंदाज बनला आहे, तर त्याने या बाबतीत डेव्हिड वॉर्नरचा विक्रमही मोडला आहे, ज्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक ६६ वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे आता विराटने त्याला मागे टाकत सर्वाधिक ६७ वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये ८ शतके आणि ५९ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये कोहलीची फलंदाजीची सरासरी सुमारे ४० आहे.
हेही वाचा – PBKS vs RCB : आरसीबीने अवघ्या ४८ तासात घेतला बदला, पंजाबला दिले जशास तसे उत्तर
विराटने ख्रिस गेलच्या विक्रमाशीही केली बरोबरी –
ही विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधील ११० वी इनिंग आहे, जेव्हा त्याने ५० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे, ज्यामध्ये त्याने आता ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावांच्या इनिंग खेळण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर यादीत अव्वल स्थानावर आहे, त्याने ११६ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी साकारली आहे. त्याच वेळी, विराट कोहली आणि ख्रिस गेल ११० वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त खेळण्याच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.





