PBKS vs RCB : आरसीबीने अवघ्या ४८ तासात घेतला बदला, पंजाबला दिले जशास तसे उत्तर

PBKS vs RCB Royal Challengers Bengaluru beat Punjab Kings : आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह आरसीबीने मागील सामन्यातील बदला घेतला, पंजाबलाही त्यांच्याच घरात पराभवाची धूळ चारली. या अगोदर पंजाबने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. आजच्या सामन्यात पंजाबने १५८ धावांचे लक्ष्य दिले होते. जे आरसीबीने विराट कोहलीच्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर १८.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.
यासह दुसऱ्या संघांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवण्याची मालिका कायम ठेवली. आरसीबीने आतापर्यंत ८ पैकी गमावलेले तीन सामने ते त्यांच्या घरच्या मैदानावर गमावले आहेत. संघाने घराबाहेरील पाचही सामने जिंकले आहेत. आरसीबीचा हा ८ सामन्यांमधील ५ वा विजय आहे. आता या हंगामात ५ संघांचे १०-१० गुण आहेत. त्याच वेळी, पंजाबला ८ सामन्यांतील तिसरा पराभव पत्करावा लागला आहे.
Jitesh Sharma dials 6⃣ to seal it in style 🙌
Virat Kohli remains unbeaten on 73*(54) in yet another chase 👏@RCBTweets secure round 2⃣ of the battle of reds ❤
Scorecard ▶ https://t.co/6htVhCbltp#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/6dqDTEPoEA
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
आरसीबीच्या गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. पंजाबच्या फलंदाजांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. पंजाब संघाने २० षटकांत ६ गडी गमावून फक्त १५७ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
When consistency meets class 🫡
Virat Kohli adds another jewel to his crown 👑
🔽 Watch his masterclass against #PBKS ❤️https://t.co/OyKTYlSYLL#TATAIPL | #PBKSvRCB | @imVkohli pic.twitter.com/XYI8cv6uug
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
त्याच वेळी, शशांक सिंगने ३१ धावांची नाबाद खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जोश इंगलिसनेही २९ धावा केल्या आणि मार्को जॅन्सन २५ धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे, कृणाल पांड्या आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २५ धावा खर्च केल्या आणि २ फलंदाजांना बाद केले. सुयश शर्मानेही ४ षटकांत २६ धावा देत २ बळी घेतले. या व्यतिरिक्त, रोमारियो शेफर्डने १ यश मिळवले. भुवनेश्वर कुमारनेही किफायतशीर गोलंदाजी केली, जरी त्याला एकही विकेट घेता आली नाही.
हेही वाचा – PBKS vs RCB : कृणाल पंड्याने जबरदस्त कॅच पकडताच, कोहलीच्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष, पाहा VIDEO
विराट-पडिक्कलने झळकावलं अर्धशतकं –
Smacking them with ease 🤌
Virat Kohli is in the mood to finish this early 🔥
Updates ▶ https://t.co/6htVhCbTiX#TATAIPL | #PBKSvRCB | @imVkohli pic.twitter.com/iuT58bJY2A
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
१५८ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. १ धाव केल्यानंतर फिल सॉल्टने आपली विकेट गमावली. पण यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात सामना जिंकणारी भागीदारी दिसून आली. दोन्ही फलंदाज अर्धशतके करण्यात यशस्वी झाले. देवदत्त पडिक्कलने १७४.२८ च्या स्ट्राईक रेटने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला ३ गडी गमावून लक्ष्य गाठता आले.





