RCB vs DC : विराटचा नवा विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणार ठरला पहिलाच फलंदाज

RCB vs DC Virat Kohli completes 1000 boundaries in IPL history : आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे अनुभवी भारतीय फलंदाज विराट कोहली. पहिल्या हंगामापासून त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. १८ व्या हंगामतही घोडदौड सुरुच आहे. त्यांने आयपीएल २०२५ मधील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध खेळताना एक नवा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंतच्या इतिहासात कोणालाच करता आला नव्हता.
आयपीएलमध्ये डझनभर विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या खात्यात आणखी एक विक्रम जमा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहलीने आयपीएलमध्ये १००० बाऊंड्री मारण्याचा विक्रम केला आहे आणि तो असा विक्रम करणारा पहिला फलंदाज बनला आहे. घरच्या मैदानावर हंगामातील त्यांचा दुसरा सामना खेळणाऱ्या आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात विराटने १४ चेंडूत एक चौकार आणि २ षटकांराच्या मदतीने २२ धावा केल्या.
१००० बाऊंड्री मारणारा विराट पहिला फलंदाज –
🚨 𝑴𝑰𝑳𝑬𝑺𝑻𝑶𝑵𝑬 🚨
Virat Kohli becomes the first batter in IPL history to smash 1000 boundaries — and he achieved it while playing solely for RCB! 🔥🙌#ViratKohli #IPL2025 #RCB #Sportskeeda pic.twitter.com/KARTijCtGI
— Sportskeeda (@Sportskeeda) April 10, 2025
ज्यामध्ये पुन्हा एकदा फिल सॉल्टने विराट कोहलीसह संघाला वादळी सुरुवात करून दिली. एकीकडे, सॉल्टने मिचेल स्टार्कवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला, तर विराटने दुसरीकडे अक्षर पटेलच्या षटकात चौकार मारत नव्या विक्रमाला गवसनी घातली.
विराट कोहलीने डावातील चौथे षटक टाकायला आलेल्या अक्षर पटेलच्या तिसऱ्या चेंडूवर कव्हर्सवरून खणखणीत षटकार मारुन हा खास विक्रम केला. यासोबतच कोहलीने आयपीएलमध्ये त्याचे १००० बाउंड्री पूर्ण केल्या.
हेही वाचा – Priyansh Arya : गंभीरचा ‘छोटा भाऊ’ IPL 2025 मध्ये घालतोय धुमाकूळ, प्रीती झिंटालाही केले चकित
कोहलीने आयपीएलच्या २४९ डावांमध्ये हा पराक्रम केलाय, ज्यात २८० षटकार आणि ७२० चौकारांचा समावेश आहे.
कोहली या बाबतीत इतका पुढे आहे की दुसरा कोणताही फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. कोहलीनंतर, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे माजी भारतीय फलंदाज शिखर धवन, ज्याच्या नावावर ९२० बाऊंड्री आहेत. डेव्हिड वॉर्नर (८९९) तिसऱ्या स्थानावर आहे आणि रोहित शर्मा (८८५) चौथ्या स्थानावर आहे. टॉप-५ बद्दल बोलायचे झाले तर, पाचवा फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्याने ७६१ बाऊंड्री मारल्या आहेत.





