Rohit Sharma HYDRO365 : ‘हिटमॅन’ने वाढदिवसादिवशी चाहत्यांना दिलं खास गिफ्ट! लॉन्च केला स्वतःचा नवीन ब्रँड, पाहा VIDEO
Rohit Sharma HYDRO365 : भारतीय क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्माने आज ३० एप्रिल रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करताना चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे.

Rohit Sharma launches HYDRO365 Brand his 39th Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आज ३० एप्रिल रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जगातील गोलंदाजांची झोप उडवणारा रोहित केवळ मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यात नेहमीच आघाडीवर असतो. याच खास दिवशी त्याने आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.
रोहित शर्माने लॉन्च केला नवीन हायड्रेशन ड्रिंक ब्रँड –
३९ व्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी रोहितने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ शेअर करत आपल्या नवीन ब्रँडची घोषणा केली आहे. रोहितने ‘आरएस बाय ट्रू एलिमेंट्स’ (RS By True Elements) सोबत भागीदारी करत ‘हायड्रो३६५’ (HYDRO365) नावाचा नवीन हायड्रेशन ड्रिंक ब्रँड लॉन्च केला आहे.
View this post on Instagram
फक्त पाणी पुरेसे नाही’ – हिटमॅनचा नवा मंत्र
View this post on Instagram
नव्या ब्रँडची माहिती देताना रोहितने आपल्या नेहमीच्या मिश्कील आणि मजेशीर अंदाजात लिहिले आहे की, “माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, उत्कृष्ट कामगिरीची सुरुवात मूलभूत गोष्टींपासून होते. हाइड्रेशन हा खूप महत्त्वाचा घटक आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. केवळ पाणी पिणे पुरेसे नसते.” पुढे त्याने सांगितले की, सुमारे ७५ टक्के लोक दिवसाची सुरुवात होण्यापूर्वीच डिहायड्रेटेड असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी त्याने ‘HYDRO365’ ची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश आहे.
रोहित शर्माची कामगिरी –
Hitman Rohit launched his own brand hydro365. 🔥
Built by Rohit Sharma – fuel your body like a champion.
Hydration redefined for everyday elite performance. pic.twitter.com/dHlDeu8Pky
— Cricket Capital (@CricketCapital7) April 30, 2026
रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. तो दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तसेच, त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि टी-२० विश्वचषक जिंकला आहे. ‘मुंबईचा राजा’ आणि ‘व्हाइट बॉल क्रिकेटचा किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचा हेल्थ ब्रँड आणून रोहितने चाहत्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. आता हिटमॅनचा हा नवीन व्यवसाय कितपत यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





