LSG vs RCB : झहीर खानच्या मुलाच्या फोटोवरील विराटच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘त्याचे डोळे तर…’

Virat Kohli and Zaheer Khan Video viral : आयपीएल २०२५ चा शेवटचा लीग सामना २७ मे रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर एलएसजी आणि आरसीबी च्यात होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार सराव करत आहेत. आरसीबी हा सामना जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल, तर एलएसजी आपला शेवटचा सामना जिंकून या हंगामाला निरोप देईल. या सामन्यापूर्वी सराव सत्रात एलएसजीचे मार्गदर्शक झहीर खानने त्याच्या मुलाचा फोटो विराटला दाखवला, ज्यावर विराटने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एकाना स्टेडियमवर सराव सत्रादरम्यान विराट कोहली आणि झहीर खान यांची भेट झाली. झहीर खानने त्याच्या फोनमधील मुलगा फतेह सिंगचा फोटो विराट कोहलीला दाखवला. झहीर खानला नुकताच मुलगा झाला आहे. फोटो पाहिल्यानंतर विराट कोहली खूप आनंदी झाला. कोहलीने झहीरला विचारले, “हा कोणासारखा दिसतोय?” एलएसजीने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जे खूप व्हायरल होत आहे.
झहीर खानच्या मुलाच्या फोटोवर विराटची प्रतिक्रिया –
Simply ‘𝘈𝘸𝘸’ 😍 pic.twitter.com/I4sKfD5JPK
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 25, 2025
सराव सत्रादरम्यान झहीर खान आणि विराट कोहली एकमेकांना भेटले. यादरम्यान, झहीर खानने त्याचा फोन काढला आणि विराटला म्हणाला, “हे बघ, मिस्टर फतेह सिंग”. यावर विराट म्हणाला, “हा कोणासारखा दिसतोय?” यावर झहीर खान म्हणाला, “चेहरा त्याची पत्नी सागरिका सारखा दिसतो”. यानंतर विराट म्हणाला, “फतेह सिंगचे डोळे अगदी तुमच्यासारखे आहेत”. यानंतर दोघे हसू लागले, ज्याचा व्हिडीओ एलएसजीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे.
हेही वाचा – PBKS vs MI : मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत
आरसीबी टॉप-२ मध्ये पोहोचण्याच्या तयारीत –
आतापर्यंतच्या आयपीएल २०२५ च्या हंगामात आरसीबीने १३ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि आता टॉप-२ मध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच एलएसजी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यांनी आतापर्यंत १३ पैकी ६ सामने जिंकले आहेत. ज्यामुळे १२ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.





