विराट- अनुष्का कृष्णा दास यांच्या कीर्तनात दंग

कृष्णा दासचा कीर्तन शो पाहण्यासाठी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी मालिका सुरू करेल, त्यानंतर संघ येथे वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही खेळेल. या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा एकही सामना नाही. त्यामुळे संघातील बहुतांश खेळाडू हॉलीडे एन्जॉय करत आहे.
Virat Kohli and Anushka Sharma attend Krishna Das Kirtan in London Yesterday pic.twitter.com/IRRnz8peh3
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 17, 2023
दरम्यान, कीर्तन ऐकण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का प्रसिद्ध अमेरिकन गायक कृष्णा दास यांच्या कीर्तन कार्यक्रमात पोहोचला. कृष्ण दास हे लोकप्रिय भक्तिगीतांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कीर्तन ऐकण्यासाठी पोहोचल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली आणि अनुष्का प्रेक्षकांमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी त्या दोघांनीही प्रेक्षकांमध्ये बसून किर्तनाचा आनंद लुटला. कृष्णा दास यांच्या बद्दल बोलायचे तर, ते मुळचे अमेरिकन गायक. भक्तीगीते गाण्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. गेल्या ४० वर्षांपासून कृष्णा दास हे कीर्तन करत असून त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराट आणि अनुष्का याआधी अनेकवेळा धार्मिक स्थळांवर स्पॉट झाले आहेत. या दोघांनी यापूर्वी भारतातील उज्जैन येथील महाकालाचे दर्शन घेतले होते, त्यानंतर ते वृंदावनलाही गेले होते.





