हेल्मेट घालून स्कुटीवरून फिरणाऱ्या विराट-अनुष्काला चाहत्यांनी ओळखलं,बाईक राईड करणाऱ्या जोडीचा video viral

मुंबई – क्रिकेट विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीला जगभरातून प्रचंड मोठी फॅन फ्लॉलोविंग मिळालेली आहे. त्यामुळे या जोडीची प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांना आवडते. खराब फॉममुळे विराट कोहली सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. सध्या एका जाहिरातीच्या शूटनंतर विराट अनुष्काने चक्क सकूटीवरून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहली आपल्या खान पानबाबत चांगलेच लक्ष ठेवतो तसेच प्रवास करतानाही तो आपल्या कंफ़र्टचा नेहमीच विचार करत असतो. अशात विराट अनुष्काने थेट स्कुटीवरून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काम संपल्यानंतर विराट अनुष्काने हेल्मेट घातले आणि मीडियासह कोणीही आपल्याला ओळखणार नाही याची खबरदारी घेत आपला दुचाकीवरचा प्रवास सुरु केला.
View this post on Instagram
हेल्मेटमुळं त्यांना कोणीही ओळखू शकल नाही. हेल्मेट घेताना आणि ते घालताना मात्र दोघेही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला. नेटकऱ्यांनी यावर तुफान कमेंटबाजी केली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने विराटसोबतचे आपले काही फोटो शेअर केले होते ज्यामध्ये एका नव्या ब्रँडसोबत जोडले जाणार असल्याचे अनुष्काने सांगितले होते.





