Virat Kohli : विराट-अनुष्काचा लंडनच्या रस्त्यावरील VIDEO व्हायरल, ‘सामान्य जीवनाचा’ घेत आहे आनंद

Virat Anushka Spotted In London Streets : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आपली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तसेच दोन्ही मुलांसह लंडनमध्ये वास्तव्यास आहे. हे जोडपे नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्याला प्राधान्य देते. नुकतेच दोघेही विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते. आता लंडनच्या रस्त्यांवर फिरतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. विराटने काळी शॉर्ट्स आणि तपकिरी टी-शर्ट परिधान केला होता, तर अनुष्काने पांढरी जॅकेट घातली होती. व्हिडीओमध्ये दोघेही स्थानिक लोकांशी बोलताना आणि हसताना दिसत आहेत. विराटच्या हातात काळी छत्री आणि पाण्याची बाटली दिसत होती. भारतात सामान्य नागरिकांप्रमाणे रस्त्यावर फिरणे या जोडप्यासाठी कठीण आहे, परंतु लंडनमध्ये ते या स्वातंत्र्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
विराट कोहली कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त –
VIRAT KOHLI & ANUSHKA SHARMA AT THE LONDON STREETS. ❤️
— Tanuj (@ImTanujSingh) August 17, 2025
आयपीएल 2025 दरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मानंतर त्याने हा निर्णय घेतला. आता विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटसाठी भारतीय संघाकडून खेळतो. आयपीएलनंतर तो क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. आता तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसू शकतो.
हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या आशिया कप निवडीवर चर्चा तापली, आकाश चोप्रा काय म्हणाले? जाणून घ्या
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
36 वर्षीय विराट कोहलीने भारतासाठी 123 कसोटी, 302 एकदिवसीय (आतापर्यंत) आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतकांसह 9230 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 57.9 च्या अप्रतिम सरासरीने 14181 धावा केल्या असून, त्याच्या नावावर 51 शतके आणि 74 अर्धशतके आहेत. टी-20 मध्ये किंग कोहलीने 38 अर्धशतके आणि 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत. आपल्या या शानदार करिअरमध्ये विराटने अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत.





