Rohit Virat Fangirls : ‘मी डॉक्टर आहे अन् रोहित माझं औषध…’; दोन तरुणींनी ‘रोको’साठी आणलेल्या पोस्टरने वेधलं लक्ष!

Rohit Virat Fangirls poster viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याने वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर ऐतिहासिक सुरुवात झाली. या मैदानावरील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरल्याने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या ‘रो-को’ जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती, मात्र यात दोन तरुणींच्या हटके फलकबाजीने (Posters) सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हटके पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा –
स्टेडियममध्ये रोहित आणि विराटला चीअर करण्यासाठी आलेल्या दोन तरुणींचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. पहिले पोस्टर: एका तरुणीने आपल्या पोस्टरवर लिहिले होते, “मी डॉक्टर आहे आणि रोहित शर्मा हे माझ्यासाठी औषध (Medicine) आहे.” रोहितवरील तिच्या या अनोख्या प्रेमाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
Cute Fangirls with poster for Rohit Sharma and Virat Kohli at BCA stadium Vadodara.❤️🔥 pic.twitter.com/OiXW1I1w6R
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) January 11, 2026
दुसरे पोस्टर: तिच्या मैत्रिणीने किंग कोहलीसाठी खास संदेश लिहिला होता. तिने विराटची मुलगी वामिका हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, विराटने आज शतक झळकावून लेकीचा वाढदिवस साजरा करावा, अशी इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा – BCCI वर प्रश्नांची सरबत्ती! IND vs NZ सामन्यात बांगलादेशी अंपायरची एन्ट्री; कुणाचा आहे हा निर्णय? जाणून घ्या
मैदानात ‘रो-को’ माहोल!
रोहित आणि विराटने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता हे दिग्गज फक्त वनडे फॉरमॅटमध्येच एकत्र खेळताना दिसतात. त्यामुळे या जोडीला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी हे दोघेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळले होते, ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेटलाही आंतरराष्ट्रीय सामन्याचे स्वरूप आले होते. आज वडोदऱ्यातही तोच जबरदस्त माहोल अनुभवायला मिळाला.
हेही वाचा – Ellyse Babar Photo : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सुंदरी एलिस पेरीने बाबर आझमला केलं प्रपोज? फोटो होतोय व्हायरल
सामन्याबद्दल बोलायचे तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघाने ५० षटकांत आठ गडी गमावून ३०० धावा केल्या. डॅरिल मिशेलने सर्वाधिक ८४ धावा केल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. संघाला पहिला धक्का ११७ धावांवर बसला. हर्षित राणाने डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.





