Bangladesh Umpire Controversy in IND vs NZ match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मैदानावर जगातील टॉप-२ संघ आमने-सामने असताना सर्वांचे लक्ष मात्र टीव्ही अंपायरकडे वळले. बांगलादेशचे अंपायर शरफुद्दौला सैकत (Sharfuddoula Saikat) या सामन्यात तिसऱ्या अंपायरची भूमिका बजावत होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचा तणाव पाहता, सैकत यांची भारतातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी बांगलादेशी अंपायरच्या नियुक्तीवरून बीसीसीआयला धारेवर धरले. बीसीसीआयवर प्रश्नांची सरबत्ती, पण सत्य वेगळेच! आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायर्सची नियुक्ती बीसीसीआय नाही तर आयसीसी करते. शरफुद्दौला सैकत हे आयसीसीच्या एलीट पॅनेलचे सदस्य आहेत. नियमानुसार, कोणत्याही आंतरराष्ट्रीय वनडे किंवा टी-२० मालिकेत किमान एक तटस्थ (Neutral) अंपायर आयसीसी एलीट पॅनेलचा असावा लागतो. त्याच नियमांतर्गत सैकत यांची निवड करण्यात आली आहे. हेही वाचा – Ellyse Babar Photo : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सुंदरी एलिस पेरीने बाबर आझमला केलं प्रपोज? फोटो होतोय व्हायरल कशी होते अंपायर्सची निवड? आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरी यांची नियुक्ती ही कामगिरी, अनुभव आणि उपलब्धतेच्या आधारावर आयसीसीकडून केली जाते. यजमान बोर्ड (उदा. बीसीसीआय) केवळ चौथ्या अंपायरची किंवा स्थानिक सामन्यांतील पंचांची नियुक्ती करू शकते. महत्त्वाच्या अंपायर्सवर केवळ आयसीसीचा अधिकार असतो. हेही वाचा – IND vs NZ : किवी सलामीवीरांनी रचला इतिहास! गिल-गंभीरच्या राजवटीत २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांची दुर्दशा भारत-बांगलादेश क्रिकेटमधील तणाव – हा वाद चर्चेत येण्यामागे भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील सध्याचे बिघडलेले संबंध कारणीभूत आहेत: आयपीएल बंदी: मुस्तफिझूर रहमानला आयपीएल २०२६ मधून बाहेर केल्यानंतर बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. टी-२० वर्ल्ड कप वाद: फेब्रुवारी २०२६ मधील टी-२० वर्ल्ड कपचे सामने सुरक्षेचे कारण देत भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी बांगलादेशने केली आहे. तमिम इक्बाल प्रकरण: भारताची बाजू मांडल्याने तमिम इक्बालला बांगलादेशात ‘इंडियन एजंट’ ठरवण्यात आले. अशा गरम वातावरणात बांगलादेशी अंपायरचे भारतात येणे आणि तटस्थ पंच म्हणून कामगिरी बजावणे हे अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.