अश्लील रॅप साँग विरोधात वातावरण पुन्हा तापलं; आखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून विद्यापीठात तोडफोड

पुणे – पुणे विद्यापीठामध्ये अश्लील रॅप साँग प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना आंदोलक विद्यार्थी थेट सभागृहात घुसले आणि अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला जाब विचासरण्यात आला.
तसेच विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुख्य सभागृहातील वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँग चे शूटिंग झाले कसे याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
नेमकं काय घडलं? वाचा…
पुणे विद्यापीठात आज मुख्य सभागृहात विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. त्यावेळी अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आत शिरले. यावेळी कोणत्याही प्रकारची चर्चा न करत आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, यावेळी अश्लील रॅप साँगचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.





