सातारा: आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन – डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा

सातारा – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना नदी.. या नदीवर असणारे कोयना धरण पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करते. परंतु आज या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती, घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही व ज्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही, अशांना न्याय मिळवून देण्याचे काम श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर करत आहेत.
सातारा: आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन – डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा pic.twitter.com/pEZiz6hRcI
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 19, 2024
त्यानुषंगाने मूळ जावली तालुक्यातील परंतु सध्या जावली महाबळेश्वर सातारा कोरेगाव तसेच रायगड, ठाणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्त लोकांची बैठक डॉ.भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बामणोली येथे घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये कोयना धरणग्रस्तांची लढाई 1988 पासून सुरू झाली असून त्यामध्ये पहिल्या टप्याचा विजय मिळवला परंतु, शिल्लक राहिलेले शेकडो धरणग्रस्त कुटुंब आहेत. अशी एकुण पंधराशे ते दोन हजार धरणग्रस्त कुटुंब आहेत. या धरणग्रस्तांचे पुनर्वसन आद्याप अखेर झालेले नाही, म्हणून दुसरा टप्पा 2016 साली सुरू झाला. परंतु 2016 साला नंतर आज पर्यत अनेक संघर्ष करून देखील फारसे पुढे जाऊ शकलो नाही. अशी धरणग्रस्तांची भावना आहे.
आज जमीन वाटप सूरू होणे अपेक्षीत होते. परंतु एक सरकार आले ते ही पडले आणि जे दूसरे सरकार आले ते लक्ष देत नाही. काही गोष्टी पहिल्या सरकार ने आर्धावट ठेवलेल्या आहेत. आशा वेळेला आम्हाला आचार संहितेच्या आधी जमीनीचे वाटप सुरू झाले पाहिजे, व निवडणूक कालावधी मध्ये कोणत्याही आचार संहितेचा आडथळ न आणता वाटप करावे. असा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले असून सदर बैठकीवेळी कोयना धरणग्रस्त मोठया संख्येने उपस्तीत होत.
‘’आम्ही लढा करू’’लढा करत असताना सरकारला आमचा इशारा आहे, की आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही अंदोलन करून आमचा विजय मिळवल्या शिवाय आम्ही राहणार नाही. असा संघर्ष ऑगस्ट महिन्यापासून करण्याचा र्निधार आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे.”
– डॉ.भारत पाटणकर, अध्यक्ष श्रमीक मुक्ती दल
“कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या सूचनेनुसार पुढील अंदोलनाची दिशा ठरवू व जमीन वाटप न झाल्यास डॉ.भारत पाटणकर यांच्या सुचनेनुसार पुढील महीन्यात तीव्र अंदोलन करण्यात येईल.”
– प्रकाश देवजी साळुंखे, अध्यक्ष- तालुका- जावळी, महाबळेश्वर





