बांगलादेशात दुर्गा विसर्जनाच्यावेळी हिंसाचार, ३ जखमी
Updated On:

ढाका – बांगलादेशात दुर्गा देवीच्या विसर्जनाच्यावेळी पोलीस आणि हिंदू समुदायामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये किमान ३ जण जखमी झाले आहेत.
रविवारी रात्री उशिरा बुरीगंगा नदीत मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीवर जुन्या ढाक्यातील पटुआटुली भागातील नूर सुपर मार्केटच्या छतावरून हल्लेखोरांनी विटा फेकल्या.
यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघेजण जखमी झाले. या हल्ल्यानंतर हिंदू समुदायाच्या सदस्यांनी बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांनी रोखले.
यामुळे पोलीस आणि हिंदू समुदायामध्ये जोरदार बाचाबाची झाली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. परिस्थितीमध्ये तणाव निर्माण झाल्यावर लष्कराच्या तुकडीला पाचारण करावे लागले होते. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





