Vinod Tawde On Rahul Gandhi : ‘अदानी आणि कॉंग्रेसचे जुने नाते…’; विनोद तावडेंकडून राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर

Vinod Tawde । Rahul Gandhi – गौतम अदानींचा जो विकास झाला, तो काँग्रेसच्याच काळात झाला, त्यामुळे भाजपा, अदानी आणि मोदी हे नाते, तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहात, ते चुकीचे आहे.
ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणामध्ये १२,४०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला, राजस्थानमध्ये ४६ हजार कोटींचा सोलर प्रोजेक्ट अदानींना देण्यात आला, ते गेहलोत कुणाचे होते, अदानी कुणाचे होते? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप नेते विनोद तावडे यांनी केली.
प्रचाराची रणधुमाळी संपण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्योगपती गौतम अदानी यांना पूरक असणारे निर्णय घेतले जात असल्याचे आरोप केले होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांचे संगनमत असल्याचा आरोप देखील केला. राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजप नेते विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी तावडे यांनी २०१४ पूर्वीचे व २०१४ नंतर अदानी समूहाला मिळालेल्या कामाची यादीच वाचून दाखविली.
अदानी आणि वाड्रांचे देखील फोटो
राहुल गांधी यांनी पत्रकारपरिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो काढून पत्रकारांना दाखविले. यावर विनोद तावडे यांनी जोरदार हल्ला केला.
ते म्हणाले की, असे फोटो हे अदानी व रॉबर्ट वाड्रा यांचे देखील आहे. अदानी यांचे फोटो राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शशी थरूर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यसोबत देखील आहे.
हरियाणातील फोटो हे २०१४ पूर्वीचे आहेत. त्यामुळे अदानी आणि काँग्रेसचे नाते जुने आहेत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे तावडे बोलताना म्हणाले.





