“पराभव दिसत असल्याने विरोधकांचा रडीचा डाव” ; विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

Vinod Tawde in Virar । भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये राडा केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या राड्यावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने हा रडीचा डाव खेळाला जात असल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात येत आहे.
पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधकांकडून आरोप Vinod Tawde in Virar ।
पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा. तसेच सदर प्रकरणाबाबत पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले.
विनोद तावडे लक्ष्मण रेषा न ओलांडणारं नेतृत्व Vinod Tawde in Virar ।
नालासोपाऱ्यामधील या घटनेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या जर आरोप केला की, शरद पवार पैसे वाटताय, उद्धव ठाकरे पैसे वाटताय, विनोद तावडे पैसे वाटताय, मग आपण विश्वास तरी ठेऊ का?, विनोद तावडे खूप मोठे नेतृत्व आहे. विनोद तावडे लक्ष्मण रेषा न ओलांडणारं नेतृत्व आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोणत्या स्थरावरचे नेते आहेत, ते पैसे वाटतील का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
हा आरोपच मुळात हास्यास्पद
राष्ट्रीय स्तरावरील नेता एका विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाकिटे वाटण्यासाठी जातो हा आरोपच मुळात हास्यास्पद वाटतो अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी,”मला वाटतंय पैसे वाटायला विनोद तावडे जातीलच का…ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले असू शकतात. पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारचा आरोप केला जात आहे. चौकशी आणि निष्कर्षाअंती काय खरं आहे हे समोर येईल” असेही त्यांनी यावेळी म्हटले.





