Vinod Kambli | पुन्हा एकदा विनोद कांबळीची खालावली प्रकृती, रुग्णालयात केलं दाखल…

Vinod Kambli Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्याला शनिवारी रात्री ठाणे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे.
अलीकडेच सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर तो चर्चेत आला होता. कांबळी हा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या एका व्यसनाधीनतेमुळे तो खूप त्रस्त आहे. यासाठी तो अनेकवेळा पुनर्वसन केंद्रातही गेला आहे.
In pictures: Cricketer Vinod Kambli’s condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital in Thane late Saturday night. His condition is now stable but remains critical. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) December 23, 2024
वास्तविक, नुकताच विनोद कांबळी चर्चेत आला होता. रमाकांत आचरेकर स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तो उपस्थित होता. या कार्यक्रमाला सचिनही उपस्थित होता. त्यादरम्यान सचिन आणि कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. कांबळीला सचिनने आपल्या जवळ बसवायचे होते. पण काही वेळ वाट बघून तो दुसऱ्या जागी बसला.
हृदयविकारासोबतच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्याची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही.
IND vs AUS 4th Test | मेलबर्नच्या चाहत्यांना ‘विराट कोहली’कडून धमाकेदार खेळीची अपेक्षा…
कांबळीची कारकिर्द….
कांबळीने टीम इंडियासाठी अनेक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 104 एकदिवसीय सामने खेळताना 2 हजार 477 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कांबळीने 2 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या 106 धावा आहे. कांबळीने 17 कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये 1084 धावा केल्या आहेत. त्याची फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. कांबळीने प्रथम श्रेणी सामन्यात ९९६५ धावा केल्या आहेत. कांबळीची तुलना एकेकाळी अनेक बड्या क्रिकेटपटूंशी केली जात होती. पण तो सध्या वाईट काळातून जात आहे.





