Grand Prix of Spain 2024 : ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची दमदार कामगिरी, स्पेन ग्रांप्री स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक…

Grand Prix of Spain 2024 wrestling Title : पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने शनिवारी स्पेन ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. दोनवेळच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या विनेशने अंतिम फेरीत मारिया ट्युमरेकोव्हाचा 10-5 असा पराभव करून पहिले स्थान पटकावले.
Update: 2024 Grand Prix of Spain🇪🇸🤼♀☑️#TOPSchemeAthlete and star wrestler Vinesh Phogat wins gold medal🥇in women’s 50 kg category by defeating Russian🇷🇺 wrestler 10-5.
Many congratulations, champ!👏🏻🥳
Best wishes for #Paris2024👍🏻@Phogat_Vinesh @wfi_wrestling pic.twitter.com/P33uJLPdls
— SAI Media (@Media_SAI) July 7, 2024
विनेशला बुधवारी शेवटच्या क्षणी शेंगेन व्हिसा मिळाला आणि तिने कोणत्याही अडचणीशिवाय तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 29 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश हिनं याआधी क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा 12-4 असा पराभव केला. त्यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत बर्मिंगहॅम 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कॅनडाच्या मॅडिसन पार्केसविरुद्ध विजय नोंदवला होता. उपांत्य फेरीत, विनेशने आणखी एका कॅनडियन खेळाडू केटी डचॅकचा 9-4 गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
स्पेन ग्रांप्री स्पर्धेतील सुवर्णमय कामगिरीनंतर आता स्पेनमधील प्रशिक्षण-सह-स्पर्धा कालावधीनंतर, विनेश पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 20 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला जाईल.





