वाळुंज बाह्यवळण रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

नगर – वांळुज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. पंधरा दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होईल व दररोज पाणी मारले जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर -सोलापूर महामार्गावरील वांळुज ( ता. नगर ) ते नगर -मनामड बाह्यवळण रस्ता आहे. विळदपासून वांळुजच्या शिवारापर्यत रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाले . मात्र वांळुज येथील बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या वस्तीजवळ हे काम येऊन थांबले . काम करणाऱ्या ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे हा रस्ता रखडला आहे . दिड किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्यालगत नागरिकांचे घरे , शेती आहे.
या रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . धुळीमुळे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा याबाबतचे निवेदन महादेव शेळमकर व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. .या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे वांळुज येथील ग्रामस्थांनी नगर-सोलापूर महामार्गावर आज सकाळी आंदोलन केले. यावेळी महिलांनी मालवाहतूक गाडया अडवल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालून हा रस्ता तातडीने मार्गा लावण्यासंदर्भात चर्चा केली .
यावेळी सरपंच लताबाई महादेव शेळमकर, संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर, राजेंद्र कर्डीले, सुखदेव दरेकर, संदीप मोरे, कुंदन शिंदे, अनिल मोरे, बाजीराव दरेकर, विजय शेळमकर, रावसाहेब शिंदे, सोमनाथ जाधव, नवनाथ हिंगे ,भरत दरेकर, वैभव सपाटे, लंकाबाई दरेकर, शोभा दरेकर, शंकुतला हिंगे ,सरस्वती दरेकर ,अलका शिंदे ,चंदाबाई जाधव, महंमद पठाण, बाळासाहेब कोल्हे, मोहन दरेकर ,आकाश जाधव, संतोष गायकवाड, विजय हिंगे, कुंडलिक दरेकर उपास्थित होते.





