Vijaya Shinde – राष्ट्रीय पातळीवरील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका विजया रामदास शिंदे यांना ‘बेस्ट वूमन लीडर ऑफ द इयर 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन तसेच खछऋजचएऊख- आणि छ-ऋउणइ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय नागरी सहकारी बँकिंग शिखर परिषदेत, पुणे येथे प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विजया शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमास महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्राहेमचा, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे सचिव सुभाष मोहिते, निवृत्त आयकर अधिकारी भगवान पाटील, तसेच शुभम गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. ‘बेस्ट वूमन लीडर ऑफ द इयर 2026’ हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी तो केवळ माझा नसून माझ्या कुटुंबीय, सहकारी आणि शुभेच्छुकांच्या पाठबळाचे फलित आहे. सहकार क्षेत्रात मिळालेला विश्वास आणि साथ यामुळेच हे यश शक्य झाले. भविष्यातही संस्थेच्या प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या विश्वासाला अधिक दृढ करण्यासाठी मी अधिक जबाबदारीने कार्यरत राहीन. – विजया शिंदे, माजी अध्यक्ष राजगुरूनगर बँक