Pune District : सहकार क्षेत्र बनले समृद्ध

राजगुरूनगर : आपला देश हा शेती प्रधान देश आहे. देशातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ती शेती व्यवसाय करते. देशात सहकार क्षेत्र समृद्ध बनले आहे. त्याचा कारभार स्वतंत्र्यपणे करण्यासाठी सहकार मंत्रालय देशात सुरू झाले आहे. सहकार चळवळ समृद्ध आणि सशक्त बनविण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. केंद्रीय पातळीवर त्यास चालना मिळत आहे. गावागावंत सहकार क्षेत्र सशक्त, मजबूत आणि बळकट केले जात असून त्या माध्यमातून गावातील नागरिकांना आर्थिक साक्षर केले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर बँकेच्या भांबोली (वासुली फाटा) या 18 व्या शाखेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.9) रोजी झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खेडचे आमदार बाबाजी काळे, भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, भांबोलीच्या सरपंच शीतल पिंजण, वासुलीच्या सरपंच कोमल पाचपुते, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, प्रांत अधिकारी अनिल दौंडे, नायब तहसीलदार राम बीजे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, राजू सांडभोर, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, गणेश सांडभोर, राहुल तांबे, अरुण थिगळे, सागर पाटोळे, विनायक घुमटकर, दत्तात्रय भेगडे, विजय डोळस, अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, समीर आहेर, सचिन मांजरे, धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, प्रकाश डोळस,विकास बाणखेले, दीपक वारुळे, सुरेश कौदरे, महेश शेवकरी, राजन परदेशी, संजय घुंडरे, बँकेचे अधिकारी संजय ससाणे, शाखा अधिकारी सारिका फुके, सुनील देवकर, पूजा बुट्टे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी, सूत्रसंचालन योगिता पाचारणे, बाळासाहेब घाटे यांनी तर बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी आभार मानले.
परंपरेवर आणि उत्तम कारभाराच्या जोरावर बँक आजही सहकार क्षेत्रात पहिल्या स्थानावर आहे. खासगी बँकांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञान उभे केले आहे. बँकेने पुढील 50 वर्षे टिकेल असा तांत्रिक, भौतिक आणि आर्थिक पाया मजबूत केला आहे. बँकेने तुकोबा आवर्त ठेव योजना सुरू केली आहे. 2023 -24 वर्षाचा 9 टक्के दराने लाभांश सभासद खातेदारांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच रिजर्व्ह बँकेची नागरी सहकारी बँकांना अनेक बंधने आहेत त्यातली काही बँकेच्या हिताची आहेत काही अटीचा बँकांना फार त्रास होत आहे. तरी काही अटी शिथिल करा.
– दिनेश ओसवाल, अध्यक्ष, राजगुरूनगर सहाकारी बँकभामचंद्र डोंगर परिसराचा विकास करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकाराच्या माध्यमातून या परिसराच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पाठपुरावा करू, त्यांच्या माध्यमातून वासुली- भांबोली गावाच्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करू.
– बाबाजी काळे आमदार
सर्वसामान्यांना आधार देणारी राजगुरूनगर बँक
राजगुरुनगर सहकारी बँक सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक ठरली आहे. आरबीआयचे निकष पूर्ण करून राजगुरुनगर सहकारी बँकेने प्रगती साधली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल केली आहे ही अभिमानस्पद बाब आहे, असे गौरवोद्गार मंत्री मोहोळ यांनी काढले.





