पुणे जिल्हा | राजगुरूनगर बँकेचा निव्वळ नफा 15 कोटी

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – राजगुरूनगर सहकारी बँकेस निव्वळ नफा 15. 2 कोटी रुपये झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
पुणे जिह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.15) राजगुरूनगर येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दिनेश ओसवाल यांच्या मनोगतानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.
यावेळी उपाध्यक्ष अविनाश कहाणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, राजेंद्र वाळुंज, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, गणेश थिगळे, अरुण थिगळे, अॅड. राहुल तांबेपाटील, सागर पाटोळे, विजय डोळस,
अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, विनायक घुमटकर, समीर आहेर, दत्ता भेगडे, सचिन मांजरे तज्ज्ञ संचालक अॅडज धर्मेंद्र खांडरे, सुरेश कौदरे, गौतम कोतवाल,
महेश शेवकरी, प्रशांत गदिया यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर, सम्राट सुपेकर, अंकुश कोहिणकर, दिलीप मलघे,
बाळासाहेब घोलप, मंजित महिंद्रकर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी अहवाल वाचन केल्यानंतर सभेला सुरुवात झाली.
दिनेश ओसवाल म्हणाले की, राजगुरूनगर सहकारी बँकेचा आलेख नेहमीच उंचावत आहे. यात सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. सभासदांसाठी नावीन्य पूर्ण योजना बँकेकडून दिल्या जात आहेत.
बँकेने सभासदांसाठी 1 लाखावरून 2 लाखावर सभासद विमा रक्कम केली आहे. शेतकर्यांसाठी नव्या योजना कमी व्याजदरात सुरू केल्या आहेत. शैक्षणिक कर्जासह घर कर्ज, घर दुरुस्तीसाठी कर्ज आदी योजना सुरू केल्या आहेत.
सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला आहे. बँक ग्राहकांसाठी आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दुसरीकडे थकीत कर्जाची वसुली केली जात आहे. मागील वर्षापेक्षा जास्त कर्ज वसूल झाला आहे.
लहान कर्जाला प्राध्यान्य, बँकेची वसुली, वसुली अधिकारी बदल, तज्ज्ञ संचालक आरबीआय निकष व दोष दुरुस्ती, सभासदांना जादा लाभांश मिळावा, एकरकमी कर्ज परतफेड, आदी विषयांवर चर्चा झाली.
या सर्वसाधारण सभेत सभासदाच्या वतीने बाबा राक्षे, खंडू थिगळे, अॅड. महादेव घुले, रेवण थिगळे, प्रकाश पाचारणे, मारुती सातकर, सतीश नाईकरे, धनंजय भागवत आदींनी सहभाग घेतला. सभासदांच्या प्रश्नाला प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी उत्तरे दिली.
ठराव क्रमांक दोनवेळी गोंधळ
सभेपुडील ठराव क्रं 2 सुरू असताना सभासद आणि बँक अध्यक्ष, संचालक यांच्यात गोंधळाचे वातावरण झाल्याने सभासदांनी सभा सोडून जेवणाकडे धाव घेतल्याने सभा गुंडाळण्यात आली
त्यातच सभेपुढे ठेवलेले सर्व ठरावांना बिनशर्त मंजुरी मिळाली. 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या विकासाचा आलेख-
बँक सभासद संख्या : 37 हजार 163
भागभांडवल : 48. 84 कोटी
स्वनिधी : 269. 71 कोटी
ठेवी : 1551. 93 कोटी
कर्जवाटप : 943. 60 कोटी
निव्वळ नफा : 15. 02 कोटी
ग्रॉस एनपीए प्रमाण : 9. 14 टक्के
नेट एनपीए प्रमाण : शून्य टक्के





