मुंबई : ओबीसीमधून ज्या मराठ्यांनी प्रमाणपत्र मिळवले आहे ते सगळ्या जागा घेऊन जातील. निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार आहे, त्यांचा माणूस स्थानिक निवडणुकांमध्ये दिसणार नाही. यांचे काम बळी तो कान पिळी असे होणार,असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. समाज मोठा आहे मात्र, ओबीसीतील नेत्यांच्या निवडणुकांचे आरक्षण संपेल आहे. आम्ही आकडेवारीनुसार स्थानिक निवडणुकानंतर दाखवून देऊ. यापासून जे लोक दोन तारखेच्या जीआरमुळे नुकसान होत नाही असे म्हणत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. कोण काय म्हणतात त्याच्याशी देणेघेणे नाही. पहिल्यांदा पात्र हा शब्द होता तो काढण्यात आला आहे. त्यामुळे नातेसंबंध, एखाद्याला ओबीसीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा वापर तो कुठेही करू शकतो. हे सध्या सत्तेमधील असलेल्या मंत्र्यांना समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कारण एकदा प्रमाणपत्र भेटल्यावर त्याचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. जीआर जरी चार जिल्ह्यासाठी असला तरी, त्या प्रमाणपत्राचा वापर करून महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकतो. नोकरीसह आर्थिक सवलती घेऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेला जीआर रद्द करायला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.