Vijay Wadettiwar : “मोदी-शाह यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद”; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचा दिली ऑफर

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी एका कार्यक्रमात ‘माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल,’ असं विधान केलं. ज्यानंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले.
याबाबत आता विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून पंतप्रधान होत असेल तर आनंदच आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (Vijay Wadettiwar)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान व्हावेत हे त्यांच्या नातेवाईकांना, भावाला वाटणे स्वभाविक आहे. मात्र ते ठरवणारे गुजरातचे दोन आहेत.
आमची सत्ता आली तर आमचे नेते ठरवतात. त्यांची सत्ता आली ते ठरवतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना हटवून महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या राजकारणातील निवृत्तही प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच काय तर वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचा ऑफर दिली.
वडेट्टीवार म्हणाले की, “पंकजा मुंडेंनी ओबीसींचे नेतृत्व करावे, भाजपमधून बाहेर पडावे. महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष तुम्हाला पूर्ण साथ देऊ. त्या जर भाजपमधून बाहेर पडल्या तर आम्ही त्यांना 100 टक्के काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ.”

Vijay Wadettiwar : “मोदी-शाह यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद”; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
वडेट्टीवार यांनी पुढे म्हणाले की, ‘त्यांना जर असे वाटत असेल की पक्षात योग्य न्याय मिळत नाही, कुटुंबाच्या त्यागाला काहीच महत्त्व दिले जात नाहीये, तर त्या नैराश्यातूनच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे विधान केले असावे.
पण पंकजाताईंना विनंती राहील की, त्या सक्षम आणि मोठ्या ओबीसी नेत्या आहात. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता, बिंधास्तपणे भाजपमधून बाहेर पडा आणि राज्याच्या ओबीसी समाजाचे नेतृत्व करा.
पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की, तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्त्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ,” असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. (Vijay Wadettiwar)
हेही वाचा :
Spying for China: हेरगिरीचा नवा अध्याय! चीनच्या नव्या रणनीतीने जगभरात खळबळ





