Vijay Wadettiwar : ‘दाल में कुछ तो काला लगता है’ म्हणत दादांच्या अपघाताच्या चौकशीची वडेट्टीवारांकडून मागणी
Vijay Wadettiwar : दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडल्याचे वडेट्टीवारांनी व्यक्त केले मत

Vijay Wadettiwar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे मिटकरी यांनी म्हंटले. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ‘दाल में कुछ तो काला लगता है’ याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी केली.
‘दाल में कुछ तो काला लगता है’
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली. मात्र हा तपासाचा भाग आहे. संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करत आहेत. वेळेवर पायलट का बदलला गेला, हा सुद्धा प्रश्न आहे.
ज्या पायलटचे नाव पुढे आलं होतं तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही. एक नक्की आहे ‘दाल में कुछ तो काला लगता है’ आणि याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातून जे काही आहे ते पुढे येईल आणि सत्य समजले पाहिजे,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले. Vijay Wadettiwar :
‘दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला’
विजय वडेट्टीवार विलगीकरणाबद्दल बोलताना म्हणाले की, “अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला का सांगितले नाही? किंवा त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? पण एक खरं दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असे मला वाटते.”
“राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली. खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला, असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा ताईंनी एवढ्या घाईने का घेतला? असं लोकांचं मत आहे. Vijay Wadettiwar :
दोन्ही राष्ट्रवादीचं विलगीकरण होऊ नये, अशी भाजपची भूमिका
कदाचित भाजपच्या दाबवापुढे असा निर्णय झाला असावा. कारण दोन्ही राष्ट्रवादीचं विलगीकरण होऊ नये, अशी भूमिका भाजपची होती आणि त्यातून भाजपला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजप बरोबर वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांची देखील इच्छा नव्हती,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
“काल भाजपच्या प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलं की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान राजीव गांधींची नियुक्तीची निवड झाली. पण काही लोकांना कळत नाही की ते पद संवैधानिक आहे आणि पंतप्रधान पद एकही दिवस रिकामा ठेवता येत नाही. उपमुख्यमंत्री पद हे काही संवैधानिक पद नाही त्यामुळे तेरावीचा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम करता आला असता,” असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. Vijay Wadettiwar :
हेही वाचा :
Lifestyle: शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस चिपचिपे होतात? या चुका कारणीभूत असू शकतात






