Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळीला अभिवादन; विदीप जाधव यांच्या कुटुंबाचीही घेतली भेट
Sunetra Pawar : अजित पवार अनेकदा महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सातारा आणि फलटणचा दौरा केला.
नुकतेच सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगम येथील महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा कराडमध्ये येत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.
Lifestyle: शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस चिपचिपे होतात? या चुका कारणीभूत असू शकतात
अजित पवार यांनी अनेकदा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली. आता सुनेत्रा पवारांनी देखील आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात येथून केली आहे.
विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट
दरम्यान, कराड येथे सकाळी सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेतल्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. येथे त्या अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट घेत आहेत.
हेही वाचा :






