नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य ; “वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा…”,अनुयायी अन् भक्तांचा आक्रमक पवित्रा

Vijay Wadettiwar । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने चांगलाच वाद उफाळून आला आहे. वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरम्यान, या अपमानास्पद वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नागपूसह राज्यातील अनेक भागात आता तीव्र पडसाद उमटले आहेत .
नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्तावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांचा कडाडून निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारीही यावेळी देण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा Vijay Wadettiwar ।
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या भक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भक्त आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आले आहे. तर वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे असा इशारा या आंदोलकांनी यावेळी दिला आहे.
पंढरपुरात जोडे मारो आंदोलन Vijay Wadettiwar ।
नरेंद्र महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या संतप्त शिष्यगणांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला केले जोडे मारो आंदोलन केलंय. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने राज्याची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे.
या सगळ्या वातावरणात नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
हेही वाचा
जयशंकर यांनी बांगलादेश सरकारला फटकारले ; म्हणाले,”कोणत्या प्रकारचे संबंध हवेत हे त्यांनी ठरवावे”





