“हे सर्व नियोजित होतं का? अशी शंका…” ; जागा वाटपाच्या गोंधळावर काँग्रेसची टीका, संजय राऊत, नाना पटोलेंचा उल्लेख

Vijay Wadettiwar। विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. हा पराभवाचा धक्का असा होता कि आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मविआच्या पराभवाला जागा वाटपाला झालेल्या विलंबाला जबाबदार धरले आहे. यासाठी त्यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पराभवाचे खापर फोडले आहे.
वेळ घालवण्यामध्ये काही षडयंत्र होतं का? Vijay Wadettiwar।
पुढे बोलताना ते म्हणाले, या सगळ्यावरून हे सर्व नियोजित होतं का? अशी शंका निर्माण होते. जागावाटपाच्या बैठकीत अनेक नेते उशीरा येत होते. ११ च्या बैठकीला काही जण २ वाजता यायचे. एका जागेवर वारंवार चर्चा होत होती. जर जागवाटापाबाबत लवकर निर्णय घेतला असता, तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता, पण वेळ घालवण्यामध्ये काही षडयंत्र होतं का, हे तपासावं लागेल, अशा संशयही त्यांनी व्यक्त केला.
नेते एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त Vijay Wadettiwar।
नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली. तेव्हापासून, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत मविआच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. जागा वाटपासाठी लागणारा वेळ हे देखील एक कारण आहे. मविआ नेत्यांना जागांचा गोंधळ सोडवण्यासाठी २० दिवस लागले. नाना पटोले आणि संजय राऊत हे तिथले प्रमुख नेते होते, आम्हीही होतो.” पण या दोघांमुळे हा गोंधळ निर्माण झाला असल्याचे मोठे विधान त्यांनी केले.





