Vijay Hazare Trophy 2024 : क्रुणाल पांड्याचा कहर, मोडित निघाला मोठा विक्रम; बडोद्याने पार केला 400 धावांचा टप्पा…

Vijay Hazare Trophy 2024 (Baroda vs Kerala) : विजय हजारे ट्रॉफी 2024 मध्ये बडोदा संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. केरळ विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान कर्णधार कृणाल पंड्याने स्फोटक फलंदाजी केली. त्याने नाबाद 80 धावा केल्या. कृणालच्या या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत निनाद अश्विन कुमारनेही चमकदार कामगिरी केली. निनादने शतक तर पार्थ कोहलीनं अर्धशतक झळकावले. विष्णू सोलंकीनं याने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
वास्तविक, बडोदा संघ केरळविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या कालावधीत संघानं 50 षटकांत 4 गडी गमावून 403 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. यादरम्यान क्रुणाल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं 54 चेंडूंचा सामना करताना नाबाद 80 धावा केल्या. क्रुणालने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीने बडोद्याला मोठ्या धावसंख्येपर्यंत सहज पोहचता आले.
निनादचे धमाकेदार शतक…
बडोद्यासाठी निनाद आणि शाश्वत रावत सलामीला आले. यादरम्यान निनादने 99 चेंडूंचा सामना करत 136 धावा केल्या. निनादने 19 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्यासोबत विष्णू सोलंकीनेही दमदार खेळी केली. त्याने 25 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. पार्थ कोहलीने 72 धावांचे योगदान दिले. भानू पुनियाने नाबाद 37 धावा केल्या. 15 चेंडूंचा सामना करताना त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे बडोद्याने 50 षटकांत 4 गडी गमावून 403 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
U23 State A Trophy | तब्बल 20 षटकार अन् 13 चौकार… IPL 2025 आधी समीर रिझवीने ठोकलं झंझावती द्विशतक…
कृणालने मोडला धावांचा विक्रम….
कृणाल पांड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अनेक खेळाडूंना मागे टाकले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 44 सामन्यांमध्ये 1 हजार 613 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत. यासह पृथ्वी शॉ क्रुणालच्या मागे पडला आहे. त्याने मुंबईसाठी 1609 धावा केल्या आहेत. तर जलज सक्सेनाने 1567 धावा केल्या आहेत. ओव्हल ऑल लिस्टमध्ये क्रुणाल 89 व्या क्रमांकावर आहे.





