Vijay Hazare Trophy 2022 – स्पर्धेच्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात तामिळनाडूचा सलामीवीर फलंदाज एन जगदीशन जबरदस्त लयीत खेळत आहे. जगदीशनने गट क च्या पाचव्या फेरीत हरियाणाविरुद्ध सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने या हंगामातील ४ सामन्यांमध्ये हे सलग चौथे शतक ठोकले आहे. जगदीशनला सीएसकेने आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या लिलावापूर्वी संघातून रिलीज केले आहे. त्यामुळे आता त्याला या कामगिरीचा पुढील काळात होणाऱ्या आयपीएलच्या मिनी लिलावात नक्कीच फायदा होणार आहे.
टी-20 संघाचे नेतृत्व पंड्याकडे सोपवण्याबाबत ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
या सामन्यात तामिळनाडू संघाकडून एन जगदीशनने १२३ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १२८ धावा केल्या. त्यामुळे हरियाणाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने ५० षटकात ७ गडी गमावत २८४ धावा केल्या. जगदीशनचे या हंगामातील हे सलग चौथे शतक ठरले आहे. मागील तीन सामन्यांमध्ये त्याने गोव्याविरुद्ध १६८, छत्तीसगडविरुद्ध १०७ आणि आंध्र प्रदेशविरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत ४ सामन्यात १३१.३३ च्या सरासरीने३९४ धावा केल्या आहेत.
टी-20 संघाचे नेतृत्व पंड्याकडे सोपवण्याबाबत ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
जगदीशनने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या ( Vijay Hazare Trophy ) एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांच्याशी बरोबरी केली आहे. या सर्व फलंदाजांनी या स्पर्धेच्या एक हंगामात प्रत्येकी चार शतके झळकावलेली आहेत. त्यामुळे आता जगदीशनने आणखी एक शतक ठोकल्यास तो या स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनेल.
विजय हजारे करंडक स्पर्धेच्या ( Vijay Hazare Trophy ) एका हंगामात सर्वाधिक शतके-
विराट कोहली – ४
पृथ्वी शॉ- ४
ऋतुराज गायकवाड – ४
देवदत्त पडिक्कल – ४
नारायण जगदीसन – ४