Mcneil Hadley Noronha : CSK चा ‘मास्टरस्ट्रोक’! दुखापतींनी ग्रासलेल्या चेन्नईच्या ताफ्यात कर्नाटकच्या वादळी अष्टपैलूची एन्ट्री; पाहा कोण आहे मॅकनील नोरोन्हा?
Mcneil Hadley Noronha : ३ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे २८ वर्षीय रामकृष्ण घोषला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी आता नोरोन्हाची वर्णी लागली आहे.

Mcneil Hadley Noronha as a replacement for the injured Ramkrishna Ghosh : आयपीएल २०२६ ( IPL 2026) च्या निर्णायक टप्प्यात असताना चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या ताफ्यात एका नव्या दमाच्या खेळाडूची भर घातली आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेलेल्या रामकृष्ण घोषच्या जागी चेन्नईने कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला संघात सामील करून घेतले आहे. चेन्नईचा संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी संघर्ष करत असताना, २४ वर्षीय नोरोन्हाचे आगमन संघासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दुखापतींचे संकट आणि नोरोन्हाची निवड Mcneil Hadley Noronha
चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा हंगाम दुखापतींच्या सावलीत राहिला आहे. खलील अहमद आणि आयुष म्हात्रे यांसारखे महत्त्वाचे खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. ३ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे २८ वर्षीय रामकृष्ण घोषला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी आता नोरोन्हाची वर्णी लागली आहे. चेन्नईचा संघ सध्या बीसीसीआयच्या अधिकृत परवानगीची वाट पाहत असून त्यानंतर या कराराची औपचारिक घोषणा केली जाईल. (Mcneil Hadley Noronha)
कोण आहे मॅकनील नोरोन्हा? (Mcneil Hadley Noronha)
मॅकनील नोरोन्हा हा कर्नाटक देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. त्याने सीके नायडू ट्रॉफी २०२४-२५ मध्ये १४ डावांत ७९.७७ च्या सरासरीने तब्बल १०३७ धावा कुटून सर्वांचे लक्ष वेधले होते, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, २०२५ ची महाराजा ट्रॉफी जिंकणाऱ्या मंगळूरू ड्रॅगन्स संघातही त्याने २५३ धावा आणि १० बळी घेत अष्टपैलू चमक दाखवली होती.
ट्रायल्समध्ये अनेक संघांना पडली होती भुरळ –
Macneil Hadley Noronha replacement talks 👀🔥
345 runs in a single C.K. Nayudu Trophy match 😭
23 fours & 25 sixes… unreal hitting.
Feels like another CSK scouting gem pic.twitter.com/0W3tw4sg8j
— sanjeev Dsr (@Varisuthehunter) May 12, 2026
नोरोन्हाने केवळ बॅटनेच नव्हे, तर आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीनेही भल्याभल्यांना चकवले आहे. आयपीएल लिलावापूर्वी त्याने दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या दिग्गज संघांसाठी ट्रायल्स दिले होते. मात्र, अखेर चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात ओढण्यात यश मिळवले आहे. आता हा युवा अष्टपैलू खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईला प्लेऑफमध्ये नेण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





