Ruturaj Gaikwad Video : ‘बाऊन्सरची भीती वाटते का?’ चिमुकलीच्या प्रश्नावर ऋतुराजचं भन्नाट उत्तर; म्हणाला, ‘आता तर बायकोला…’
Ruturaj Gaikwad Video : चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू आणि प्रशिक्षक नुकतेच 'लायनस प्रेस क्लब एडिशन'मध्ये लहान मुलांशी संवाद साधत होते, त्यावेळचा ऋतुराजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Ruturaj Gaikwad Funny Video Viral : आयपीएल २०२६ चा हंगाम सध्या शिगेला पोहोचला असून मैदानातील चुरशीसोबतच मैदानाबाहेरचे खेळाडूंचे मजेशीर किस्सेही चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. सध्या सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे एकच हशा पिकला.
‘बाऊन्सरपेक्षा बायकोची जास्त भीती वाटते’ (Ruturaj Gaikwad Funny Video Viral)
चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू आणि प्रशिक्षक नुकतेच ‘लायनस प्रेस क्लब एडिशन’मध्ये लहान मुलांशी संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, सीईओ काशी विश्वनाथ, कर्णधार ऋतुराज गायकवाड, डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि जेमी ओव्हरटन उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका चिमुकलीने ऋतुराजला निरागसपणे प्रश्न विचारला की, “वेगवान गोलंदाज जेव्हा वेगाने बाऊन्सर टाकतात, तेव्हा तुला त्यांची भीती वाटते का?”
“then I got married” got me 😭 pic.twitter.com/NVVMPcnj6H
— Ananya (@TheCricBird) May 4, 2026
यावर ऋतुराजने हसत अतिशय मिश्किल उत्तर दिले. तो म्हणाला, “मला कदाचित २-३ वर्षांपूर्वी बाऊन्सरची भीती वाटायची. पण आता माझं लग्न झालं आहे आणि मला बाऊन्सरपेक्षा माझ्या बायकोची जास्त भीती वाटते.” ऋतुराजच्या या उत्तराने संपूर्ण सभागृहात हास्याचे फवारे उडाले. ऋतुराजने ३ जून २०२३ रोजी उत्कर्षा पवारशी लग्न केले. उत्कर्षा स्वतः एक क्रिकेटपटू असून ती महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.
धोनीच्या पुनरागमनाकडे चाहत्यांच्या नजरा –
Q: “Who is your friend in the CSK team?”
Ruturaj Gaikwad: “Friend… MS Dhoni.”🤗
The most underrated bond in world cricket — MS Dhoni and Ruturaj Gaikwad🐐🔥 pic.twitter.com/uIqDwmQwlk
— Abhishek Kumar (@Abhishek060722) May 4, 2026
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सची या हंगामातील कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. संघाने १० सामन्यांपैकी ५ सामने जिंकले असून १० गुणांसह ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला आता पुढील सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘थाला’ म्हणजेच एम. एस. धोनीच्या पुनरागमनाची. (Ruturaj Gaikwad Funny Video Viral)
४४ वर्षीय धोनी सध्या पोटरीच्या दुखापतीमुळे (Calf Injury) त्रस्त असून या हंगामात त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. जरी तो सराव सत्रात नियमित दिसत असला, तरी प्रत्यक्ष सामन्यात तो कधी मैदानात उतरणार, याबाबत संघ व्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीच्या आयपीएल भविष्याबद्दल दरवर्षी चर्चा रंगते, मात्र यंदा त्याची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. (Ruturaj Gaikwad Video)





