Nagar | विद्यानिकेतन स्टेट बोर्डची कार्यकारिणी जाहीर

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकशाही मतदान प्रक्रियेनुसार विद्यार्थी कार्यकरिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व सांगून, शैक्षणिक मार्गदर्शन केले.
दरम्यान, स्कूल हेड बॉय साईराज थोरात, हेड गर्ल संजीवनी गाडेकर तसेच ग्रीन हाऊस कॅप्टन बॉय वेदांत हुरे, गर्ल वेदांती टेके, येलो हाऊस कॅप्टन बॉय साईराज विसपुते, गर्ल गायत्री महांकाळे, ब्लू हाऊस कॅप्टन बॉय शंतनु कंगले, गर्ल तनिष्का जगताप, रेड हाऊस कॅप्टन बॉय प्रतीक खंडागळे, गर्ल अक्षदा दळे तसेच शालेय शिस्तमंत्री रोहित मोरे,
वेदाश्री सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बॅचेस लावून गौरविण्यात आले. सन्मानित विद्यार्थ्यांनी संचलन करून शाळेबद्दल एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. याप्रसंगी क्रीडाशिक्षक अजय आव्हाड (एनआयएस कोच) यांनी मतदान अधिकारी म्हणून तर संगणक विभाग प्रमुख आशिष गायकवाड यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून काम पाहिले.
सुनंदा थोरात, जयश्री बागुल, दिपाली निकम, मयुर जाधव यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याकामी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अजय आव्हाड, सूत्रसंचालन स्वरा पाटील, समीक्षा लांडे यांनी केले. आभार हिंदवी रोडे हिने मानले.





