Pune News : श्री सादडी-राणकपूर जैन संघ पुणे २०२५ – २०२७ कार्यकारिणी जाहीर

पुणे: श्री सादडी-राणकपूर जैन संघ, पुणे यांच्या नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणी समितीच्या पुढाकाराने पुण्यात विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा उद्देश म्हणजे समाजातील सर्व वयोगटातील सदस्यांना एकत्र आणणे, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपणे, असा आहे. नुकतीच २०२५ – २०२७ ची कार्यकरिणी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे शहरात सध्या ५५० कुटुंबे आणि सुमारे २५०० सदस्य स्थायिक आहेत. त्यांच्या एकात्मतेसाठी व सहभागासाठी समिती विविध उपक्रम राबवत आहे. सादडी (Sadri) ही राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. सादडी-राणकपूरचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व अधोरेखित करताना अध्यक्ष रमेश पोरवाल यांनी सादडी, राजस्थानमधील उदयपूर-जोधपूर महामार्गावरील एक ऐतिहासिक गाव असून, येथील राणकपूर जैन मंदिर हे जागतिक ख्याती प्राप्त असं धार्मिक व वास्तुशिल्पदृष्ट्या अद्वितीय मंदिर असल्याचे सांगितले.
या मंदिरात १४४४ कोरीव खांब असून मंदिरातील खांब, छत, दरवाजे व गाभाऱ्यातील शिल्पकला अतिशय बारीक, कलात्मक आणि मंत्रमुग्ध करणारी आहेत. मंदिरातील कोरीव काम पाहणाऱ्याला भारतीय स्थापत्यकला आणि कारागिरी यांचे कौशल्य जाणवते. हे मंदिर श्री आदिनाथ तीर्थंकर यांना समर्पित आहे. मंदिराचे संपूर्ण रचना एकप्रकारे धर्मचक्राची रूपरेषा दर्शवते. “प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी या पवित्र भूमीला भेट द्यावी आणि या मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे,” असे अध्यक्ष रमेश पोरवाल यांनी बोलाताना नमूद केले.
अध्यक्ष – रमेश गुलाबचंद पोरवाल
उपाध्यक्ष – अशोक हमिरमल नाहर
सचिव – किशोर सुखराज पुनमिया
कोषाध्यक्ष – अनिल पुखराज रांका
सहसचिव – केतन ललित मेहता
कार्यकारिणी सदस्य
अभिषेक जैन, अजीत सोलंकी, आनंद परमार, अमित मुथा, हरीश कावेडिया, कामित रांका, निखित बंबोली, महेंद्र पालरेचा, ललित पोरवाल, श्रीपाल ओसवाल




