Vidya Balan: विद्या बालनचा मराठमोळा अंदाज; शेअर केली खास गाण्यावर रिल
Vidya Balan: विद्या बालनने मराठी गाण्यावर लिपसिंग व्हिडीओ तयार करुन शेअर केला.

Vidya Balan: अभिनेत्री विद्या बालन तिच्या सोशल मीडियावर अनेकदा मराठी रील्स शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिचा मराठी अंदाज पाहायला मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील एका स्किटवर व्हिडीओ तयार केला होता. ज्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता तिने मराठी गाण्यावर लिपसिंग व्हिडीओ तयार करुन शेअर केला.
विद्या बालनने ‘एकटा जीव सदाशिव’ या मराठी सिनेमातील ‘काल रातीला सपान पडलं’ या गाण्यावर रिल तयार केला होता. यात तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन, सुंदर अंदाजात ‘काल रातीला सपान पडलं’ या गाण्याची लिपसिंग केली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनीही प्रतिक्रिया देत विद्या बालनचं कौतुक केलं.
View this post on Instagram
विद्या बालनने बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भूल भुलैया’, ‘भुल भुलैय्या ३’, ‘कहानी’, ‘द दर्टी पिक्चर’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये विद्याने काम केलेलं आहे. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता ‘कहानी’ या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण विद्या बालनच्या जागी यामी गौतम झळकणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:





