Sanjay Shirsat : “राजकीय पडसाद उमटू नये म्हणून…”; अभिजीत दिपकेंच्या कुटुंबीयांची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट
Sanjay Shirsat : 'अभिजीत महाराष्ट्रात परतल्यानंतर त्याला सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार'

Sanjay Shirsat : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं. वाढत्या राजकीय दबावाच्या आणि देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आज अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबीयांशी चर्चा केली. भेटीनंतर पालकमंत्री संजय शिरसाट आणि अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढे मोठे यश मिळवतो, तेव्हा…’
संजय शिरसाट म्हणाले की, “अभिजीतला मोठे यश मिळाले आहे. त्याला भेटायला यायचे आधीपासूनच ठरवले होते. मात्र, त्याचे राजकीय पडसाद उमटू नयेत म्हणून भेट टाळली. तो माझ्या मतदारसंघातील तरुण आहे. माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढे मोठे यश मिळवतो, तेव्हा त्याची भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे. सरकारने अभिजीतच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून त्याला यश मिळाले.” Sanjay Shirsat
पुढे ते म्हणाले, “अभिजीतच्या आंदोलनाचा अनेक राजकीय नेते आणि पक्षांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. अभिजीत पुढील दोन-तीन दिवसांत घरी परतेल. अभिजीत महाराष्ट्रात परतल्यानंतर त्याच्या जीविताला कोणताही धोका होऊ नये, यासाठी त्याला सुरक्षा देण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.”
दरम्यान, आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अलिकडेच अभिजीत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सीजेपी समर्थकांचे आणि टीका करणाऱ्यांचेही आभार मानले. Sanjay Shirsat
हेही वाचा:






